BAN L vs WI L: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या दुसऱ्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज लीजेंड्सनं बांगलादेश लीजेंड्सचा (West Indies Legends Vs Bangladesh Legends) 6 विकेट्सनं पराभव केलाय. कानपूरच्या (Kanpur)  ग्रीन पार्क (Green Park) क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशच्या संघानं वेस्ट इंडीजच्या गोलंदाजीसमोर लोटांगण घातलंय. बांगलादेशचा संघ 19.4 षटकात अवघ्या 98 धावांवर गारद झाला. वेस्ट इंडिजकडून सांतोकीनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.


बांगलादेश लीजेंड्सनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीज लीजेंड्सनं 15. 2 षटकातचं विजय मिळवला. वेस्ट इंडिज लीजेंड्सकडून कर्णधार ड्वेन स्मिथनं दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. त्यानं 42 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 51 धावांची खेळी केली. 


बांग्लादेश लीजेंड्स संघ 98 धावांवर ढेपाळला
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेश लीजेंड्सची खराब सुरुवात झाली. बांगलादेश लीजेंड्सचा निम्मा संघ 60 धावांवर पव्हेलियनमध्ये परतला.वेस्ट इंडीज लीजेंड्सच्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर बांगलादेशचा संघ अवघ्या 98 धावांवर ऑलआऊट झाला. वेस्ट इंडीज लीजेंड्सकडून संतोकीनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, सुलेमान बेन आणि डेव मोहम्मदला यांना प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाल्या. 


कर्णधार ड्वेन स्मिथचं दमदार अर्धशतक
दरम्यान, 99 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज लीजेंड्सच्या संघानं 15.2 षटकांतच लक्ष्य गाठलं. वेस्ट इंडिज लीजेंड्स संघाचा कर्णधार ड्वेन स्मिथनं  42 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 51 धावांची दमदार खेळी केली. ड्वेन स्मिथशिवाय क्रिक एडवर्ड्सनं 22 धावांची खेळी केली. बांगलादेश लीजेंड्सकडून अब्दुर रज्जाक, आलोक कपाली आणि डोलार महमूद यांना एक-एक विकेट्स मिळाली. बांगलादेश लीजेंड्सला पराभूत करून वेस्ट इंडीज लीजेंड्सनं रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजची विजयानं सुरुवात केलीय. 


इंडिया लीजेंड्सची विजयी सलामी
इंडिया लीजेंड्सं आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यात रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामातील पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय दिग्गजांनी दमदार खेळ दाखवत 61 धावांनी विजय मिळवला आहे.या सामन्यात नाणेफेक जिंकून इंडिया लीजेंड्सच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यात स्टुवर्ट बिन्नीनं नाबाद 82 धावांची तुफानी खेळी करत संघाची धावसंख्या 217 पर्यंत पोहचवली. त्यानंतर  भेदक गोलंदाजी करत इंडिया लीजेंड्सनं दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला 156 धावांत रोखत 61 धावांनी सामना जिंकला.


हे देखील वाचा-