India vs West Indies 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेय. क्विंस पार्क ओव्हल येथे होणारा सामना वेस्ट इंडिज आणि भारत दोन्ही संघासाठी खास आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील १०० वा कसोटी सामना होय. दुसरीकडे विराट कोहलीचा हा ५०० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होय. भारतीय संघात एक बदल करण्यात आलाय. दुसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड शार्दूल ठाकूर याला संघातून बाहेर ठेवण्यात आलेय. युवा मुकेश कुमार याला पदार्पणाची संधी दिली आहे. पाहा दोन्ही संघाची प्लेईंग -
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेवन :
क्रॅग ब्रैथवेट (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, किर्क मॅकेंजी, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाज़, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, केमर रोच, जोमेल वारिकन, शैनन गेब्रियल
टीम इंडियाची प्लेइंग इलेवन :
यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, जयदेव उनादकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विडिंज खेळ उंचावण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. फलंदाज आणि गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले होते. तीन दिवसांमध्ये भारताने सामन्यात बाजी मारली होती. हा सामना भारताने एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या कसोटी सामना जिंकून क्लिन स्वीप देण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरले तर वेस्ट इंडिजचा संघ परतफेड करण्यासाठी खेळेल. पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल याने दीडशतकी खेळी केली होती. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा याने शतक तर विराट कोहलीने अर्धशतक झळकावले होते. गोलंदाजीत अश्विन याने 12 विकेट घेतल्या होत्या. तर रविंद्र जाडेजा यानेही भेदक मारा केला होता.
विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना -
भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत 499 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आज होणारा सामना विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असेल. इतके सामने खेळणारा विराट कोहली दहावा खेळाडू होणार आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वाधिक सामने खेळला आह. सचिन तेंडुलकरने 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
विराट कोहलीने आतापर्यंत 499 सामन्यातील 558 डावात फलंदाजी करताना 53.48 जबरदस्त सरासरीने 25461 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 75 शतके आणि 131 अर्धशतके आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 254* इतकी आहे.
पिच रिपोर्ट
पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओवल मैदानावर फलंदाजी करणं सोप्प आहे. या मैदानाची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. सुरुवातीचे दोन दिवस खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असेल. त्यानंतर फिरकी गोलंदाजांना येथे मदत मिळेल.