Asia Cup :  आशिया खंडातील देशांसाठी विश्वचषकानंतर सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणजे आशिया कप (Asia Cup). यंदाच्या आशिया कप (Asia Cup 2023) साठीचं वेळापत्रक बुधवारी जारी करण्यात आलेय. 30 ऑगस्टपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. दरम्यान या भव्य क्रिकेट स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ म्हटलं तर भारत (Team India) होय.  1984 पासून आतापर्यंत भारताने तब्बल 7 वेळा विजेतेपद मिळवलं आहे. 1984, 1988, 1990/91, 1995, 2010, 2016 आणि 2018 साली भारताने चषक जिंकला आहे. यंदा  30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 यादरम्यान आशिया चषक रंगणार आहे.  भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे. 

पाच वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्त्वाखाली भारताने चषक जिंकला असून यामध्ये सर्वात यशस्वी कर्णधार मोहम्मह अझराउद्दीन आणि एमएस धोनी हे आहेत. या दोघांनी देखील प्रत्येकी दोन वेळा भारताला कप जिंकवून दिला आहे. याशिवाय सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर आणि रोहित शर्मा यांनीही एक-एकदा भारताला आशिया चषक मिळवून दिला आहे. तर नेमकी वर्षनिहाय यादी कशी आहे ते पाहूया...

वर्ष कर्णधार 
1984 सुनील गावस्कर
1988 दिलीप वेंगसरकर
1990/91 मोहम्मह अझराउद्दीन 
1995 मोहम्मह अझराउद्दीन 
2010 एमएस धोनी
2016 एमएस धोनी
2018 रोहित शर्मा

कुठे पाहाता येणार सामने?

30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येतील. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहे. त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत.  टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. लवकरच आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये दोन सप्टेंबर रोजी होणार आहे.