Virat Kohli : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज 100 वा कसोटी सामना होत आहे. हा सामना विराट कोहलीसाठी खास आहे. कारण, किंग कोहलीचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना असेल. अशी कामगिरी करणारा तो भारताचा चौथा क्रिकेटपटू बनेल. तो सचिन तेंडुलकर याच्यासोबत इतर खेळाडूंच्या यादीत विराजमान होणार आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयनेही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर विराट कोहलीच कौतुक होत आहे. बीसीसीआयनेही विराट कोहलीसाठी खास पोस्ट केली आहे.

प्रवासाचे कौतुक करण्यासाठी 500 कारणं. विराट कोहलीला भारतासाठी त्याच्या 500व्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अभिनंदन, असे ट्विट बीसीसीआयने केले आहे. या ट्विटसोबत विराट कोहलीचा एक फोटोही पोस्ट केला आहे. विराट कोहलीवर सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत 499 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आज होणारा सामना विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असेल.  इतके सामने खेळणारा विराट कोहली दहावा खेळाडू होणार आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वाधिक सामने खेळला आह. सचिन तेंडुलकरने  664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

विराट कोहलीने आतापर्यंत 110 कसोटी, 274 वनडे आणि 115 वनडे असे एकूण 499 सामने खेळले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत 499 सामन्यातील 558 डावात फलंदाजी करताना 53.48 जबरदस्त सरासरीने 25461 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 75 शतके आणि 131 अर्धशतके आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या   254* इतकी आहे.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी - 

सचिन तेंडुलकर- 664 सामने.महेला जयवर्धने- 652 सामने.कुमार संगाकारा- 594 सामने.सनथ जयसूर्या- 586 सामने. रिकी पाँटिंग- 560 सामने.महेंद्र सिंह धोनी- 538 सामने.शाहिद आफ्रिदी - 524 सामनेजॅक कॅलिस- 519 सामने.राहुल द्रविड- 509 सामनेइंजमाम उल हक- 500 सामने.विराट कोहली- 499 सामने