IND Vs WI, Match Highlights :  वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉवमन पॉवेल याने तिसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने संघात फिरकी गोलंदाजाला संधी दिली आहे. भारतीय संघातही काही बदल करण्यात आलेय आहेत. हार्दिक पांड्याने नाणेफेकीवेळी प्रथम फलंदाजी करायला अवडले असते, असे सांगितले. वेस्ट इंडिजने दुखापतग्रस्त जेसन होल्डर याला आराम दिलाय. होल्डरच्या जागी फिरकीपट्टूला संधी दिली आहे. 


पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संगाला पराभवाचा सामना करावा लागला होता. फलंदाजीमुळे भारतीय संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात विडिंजने 4 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या टी20 सामन्यात दोन विकेटने विडिंजने बाजी मारली होती. आता तिसरा सामना जिंकून मालिकेत बाजी मारण्याचा विडिंजचा प्रयत्न असेल तर हा सामना जिंकून कमबॅक करण्याचा हार्दिक आणि संघाचा विचार असेल. पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना केला. पहिल्या सामन्यात टीम इंडिया फक्त 145 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजचे 4 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 152 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजने दोन विकेटने जिंकला. 


भारतीय संघात दोन बदल - 


भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. युवा यशस्वी जयस्वाल याचे टी20 मध्ये पदार्पण झालेय. कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वाल याने विस्फोटक फलंदाजी केली होती. त्याशिवाय आयपीएलमध्येही यशस्वीने आपल्या कामिगिरीने सर्वांनाच प्रभावित केले होते. आता टी20 मध्ये यशस्वी जयस्वाल याचे पदार्पण झालेय. यशस्वी जयस्वाल याच्याशिवाय अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव दुखापतीनंतर परतलाय. सलामी फलंदाज ईशान किशन याला आराम देण्यात आला आहे. त्याशिवाय रवि बिश्नोई याला वगळण्यात आले आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात रवि बिश्नोईला दमदार कामगिरी करता आली नव्हती. 


भारताची प्लेईंग 11 -


यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, सुर्यकुमार यादव (उपकर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार


वेस्ट इंडिजचे शिलेदार -


ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅकॉय.