AUS vs WI: वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघानं (Australia vs West Indies) 2-0 असा विजय मिळवलाय. या मालिकेतील पहिल्या सामना तीन विकेट्सनं जिंकून ऑस्ट्रेलियानं आधीच मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर द गाबा येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही वेस्ट इंडीजचा 31 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियानं दोन सामन्यांच्या टी-20  मालिकेवर नाव कोरलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज टीम डेव्हिडनं (Tim David) संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानं अवघ्या 20 चेंडूत 42 धावांची आक्रमक खेळी केली. ज्यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. त्‍यानं त्‍याच्‍या इनिंगमध्‍ये 110 मीटर लांब षटकारही मारला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल प्रचंड होतोय.


व्हिडिओ-






 


टीम डेव्हिडचा 110 मीटर लांब षटकार
आपल्या आक्रमक फलंदाजीने जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या टीम डेव्हिडनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात 20 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावांची आक्रमक खेळी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या डावातील 17 व्या षटकात त्यानं ओबेड मॅकॉयच्या चेंडूवर 110 मीटर लांब षटकार ठोकला. टीम डेव्हिडचा हा षटकार व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


मिचेल स्टार्कचा जबरदस्त झेल
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सलामीवीर काइल मेयर्सचा फॉलो-थ्रूमध्ये अप्रतिम झेल घेतला. कोणत्याही गोलंदाजासाठी फॉलो थ्रूमध्ये झेल पकडणं सोपं नसतं. परंतु, मिचेल स्टार्कनं चपळपणा दाखवत  काइल मेयर्सला पॅव्हेलियन माघारी धाडलं. स्टार्कच्या या अप्रतिम झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


लवकरच ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज यांच्यात कसोटी मालिका रंगणार
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेतील निर्भेळ यशानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाला धुळ चारण्यासाठी सज्ज झालाय. तर, टी-20 मालिकेतील बदला घेण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरेल. ज्यामुळं ही मालिका अतिशय रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. 


हे देखील वाचा-