Lendl Simmons Retirement : वेस्ट इंडीज क्रिकेटमधील (West Indies Cricket) एक दमदार फलंदाज असणाऱ्या लेंडल सिमन्स (Lendl Simmons) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेट प्रकारात शानदार प्रदर्शन करणाऱ्या सिमन्सची कारकिर्द चांगली असून त्याचा सीपीएलमधील (CPL) त्रिनबगो नाईट रायडर्सने (TKR) त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ही माहिती शेअर केली आहे. सिमन्सने वनडे क्रिकेटमध्ये 2 शतकं तर 16 अर्धशतकं लगावली आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातही त्याचं प्रदर्शन कमाल राहिलं आहे.






 


सिमन्सने वेस्ट इंडीजसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील डेब्यू पाकिस्तानविरुद्ध 2006 साली केला होता. तर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने 2007 साली डेब्यू केला. सिमन्सने 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 हजार 958 रन बनवले आहेत. या दरम्यान त्याने 2 शतकं आणि 16 अर्धशतकं लगावली आहेत. सिमन्सने 68 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1 हजार 527 रन केले असून यामध्ये 9 अर्धशतकं त्याने लगावली आहेत. याशिवाय 8 कसोटी सामनेही त्याने खेळले आहेत. कॅरेबियन प्रीमियर लीग अर्थात सीपीएलमध्येही त्याने चांगलं प्रदर्शन केलं असून इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने 29 सामने खेळत 1 हजार 79 रन केले आहेत. यावेळी त्याने एक शतक आणि 11 अर्धशतकं ठोकली आहेत. 100 रन हा त्याचा सर्वश्रेष्ठ स्कोर आहे.


आणखी एका वेस्ट इंडिज क्रिकेटपटूची निवृत्ती


वेस्ट इंडीजचा यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार दिनेश रामदीन (Denesh Ramdin) याने देखील आजच (18 जुलै 2022) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. तब्बल 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर रामदीननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. मात्र, तो जगभरातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळणं सुरूच ठेवणार आहे. दिनेश रामदीननं 2005 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं वेस्ट इंडीजकडून खेळताना 74 कसोटी, 139 एकदिवसीय आणि 71 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यातील 110 डावात त्यानं 25.00 च्या सरासरीनं आणि 80.35 स्टाईक रेटनं 2 हजार 220 धावा केल्या आहेत.  


हे देखील वाचा-