Saba Karim: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्यावरून सुरू झालेल्या चर्चा अद्यापही सुरुच आहे. टी-20 विश्वचषकानंतर विराटनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बीसीसीआयनं विराटला एकदिवसीय कर्णधारपदावरून त्याला हटवलं. यावरून भारतीय क्रिडा विश्वास वादळ उठलं. विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्यावरून दररोज नवनवीन माहिती समोर येऊ लागली. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू साबा करीम यांनी आयसीसीनं कर्णधार बदलण्याचा निर्णय का घेतला? याबाबत नवा खुलासा केलाय. 


टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद सोडण्याचं जाहीर केलं. दरम्यान, टी-20 विश्वचषकानंतर विराटनं आधी कर्णधार पद सोडलं. त्यानंतर विराटनं कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून  पायउतार झाला. मात्र, त्यानंतर बीसीसीआयनं विराट कोहलीला एकदिवसीय कर्णधार पदावरून हटवलं. यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात असताना साबा करीम यांनी विराटनं कर्णधारपद सोडणं अजिबात अपेक्षित नव्हतं, असं म्हटलंय.


साबा करीमकाय म्हणाले?
विराट कोहलीनं अचानक कसोटी संघाचा कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळं बीसीसीआयला दुहेरी कर्णधारपदाच्या निर्णायात बदल करण्यात आलाय. त्यावेळी एकदिवसीय आणि टी-20 संघाचे दोन वेगवेगळं कर्णधार नसावा, असा बीसीसीआयचा निर्णय होता. कोहलीनं कसोटी संघाचं कर्णधारपद सोडणं अजिबात अपेक्षित नव्हतं. विराट कोहलीनं राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माला तिन्ही प्रकारांमध्ये कर्णधार करण्यात आलं, असं करीम साबा यांनी म्हटलं आहे. “रोहीत शर्मा हा कर्णधारपदासाठी एक आदर्श उमेदवार आहे. आपण तरुण खेळाडूंना त्याच्या हाताखाली तयार करू शकतो", अशा शब्दात साबा करीम यांनी रोहित शर्माचं कौतूक केलंय.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha