ICC ODI Women's Rankings: आयसीसीनं मंगळवारी महिला एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर केलीय. न्यूझीलंडविरुद्ध पराभवनंतरही भारताचे फलंदाज रिचा घोष आणि दिप्ती शर्मानं आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतलीय. आयसीसीनं जाहीर केलेल्या महिला फलंदाजांच्या यादीत रिचा घोषं 54 व्या स्थानी तर, दिप्ती शर्मानं 18 व्या स्थानी झेप घेतलीय. याशिवाय, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या भारताचा कर्णधार मिताजी राजनं आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. 


न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारतीय संघानं निराशाजनक कामगिरी केलीय. पाच सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 4-0 नं पिछाडीवर आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 69 धावांची खेळी करणाऱ्या दीप्तीनं फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा करत 18व्या स्थानावर पोहचलीय.तर, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चार विकेट्स घेतल्यामुळं ती गोलंदाजांच्या क्रमवारीत 13 व्या क्रमांकावर पोहचली आहे. तसेच ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत ती चौथ्या स्थानावर कायम आहे. भारतीय महिला संघाची न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक असली तरी क्रमवारीत काही सकारात्मकता पाहायला मिळाल्या आहेत.


दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तिच्या 65 धावांच्या खेळीमुळे युवा यष्टिरक्षक रिचानं तिच्या क्रमवारीत 15 स्थानांनी सुधारणा करून 54 व्या क्रमांकावर झेप घेतलीय.भारताची सलामीवीर स्मृती मानधना क्वारंटाईनमध्ये असल्यामुळं पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघाचा भाग नव्हती. परंतु ती क्रमवारीत आठव्या स्थानावर कायम आहे. मानधनाच्या अनुपस्थितीचा फायदा मेघना उचलण्यात यशस्वी ठरली. 49 आणि 61 धावांच्या खेळीसह ती फलंदाजांच्या यादीत 113 स्थानावरून 67 व्या स्थानावर झेप घेतलीय. 


भारताची अनुभवी गोलंदाजा झूलन गोस्वामी आयसीसी गोलंदाजांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये असणारी एकमेव भारतीय खेळाडू आहे. आयसीसी गोलंदाजांच्या यादीत झूलन गोस्वामी चौथ्या क्रमाकांवर आहे. न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केरनं दुसऱ्या सामन्यात शतक आणि तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. ज्यामुळं आयसीसी क्रमवारीत तिला मोठं यश मिळालं आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha