Wasim Jaffer, T20 World Cup 2024 Team India Updates : टी20 विश्वचषकासाठी लवकरच टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा होणार आहे. एक जून 2024 पासून टी 20 विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. त्याआधीच अनेक आजी-माजी खेळाडूंनी विश्वचषकासाठी आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारताचा माजी सलामी फलंदाज वसीम जाफर यानेही विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड केली आहे. वसीम जाफर यानं आपल्या ताफ्यात 7 फलंदाज, तीन अष्टपैलू आणि पाच गोलंदाजांचा समावेश केला आहे. वसीम जाफर यानं निवडलेला संघ बेस्ट असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहे. जाफरने निवलेल्या संघावर बीसीसीआय निवड समितीही शिक्कामोर्तब करु शकेल, असं मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केलेय. वसीम जाफरनं आपल्या 15 जणांच्या चमूमध्ये शुभमन गिल, केएल राहुल, ईशान किशन आणि अक्षर पटेल यासारख्या दिग्गजांना निवडले नाही.


संजू सॅमसनसोबत सात फलंजाजांना स्थान - 


वसीम जाफरने आपल्या संघात संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांना विकेटकीपर फलंदाज म्हणून निवडले आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांना सलामी फलंदाज म्हणून संधी दिली आहे. त्यासोबतच विराट कोहलीलाही ताफ्यात ठेवलं आहे. मध्यक्रममध्ये सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह यांना स्थान दिलेय. 


तीन अष्टपैलू खेळाडूंना स्थान - 


वसीम जाफरने आपल्या संघात तीन अष्टपैलू खेळाडूंना स्थान दिलेय. यामध्ये हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजा यांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये जाफरने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह यांची निवड केली आहे. तर फिरकी विभागात जाफरने कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना स्थान दिले आहे. चहल आणि कुलदीप यांनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याशिवाय बुमराह यानेही भेदक मारा केला आहे. 


वसीम जाफरनं टी20 वर्ल्ड कप 2024 साठी कोण कोणत्या खेळाडूंना निवडलं ?


रोहित शर्मा, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ऋषभ पंत, रिंकू सिंह, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आमि मोहम्मद सिराज