IND vs SA T20 Series: भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर पडलाय. त्यांच्या जागी मोहम्मद सिराजची (Mohammed Siraj) संघात निवड करण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं शुक्रवारी दिलीय. बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलीय.


तिरुवनंतपुरमच्या (Thiruvananthapuram) ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Greenfield International Stadium) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारी खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याच्या पाठीला किरकोळ दुखापत झाली असून उर्वरित सामन्यात तो खेळेल, अशी अपेक्षा केली जात होती. 


बीसीसीआयचं ट्वीट-






 


भारताला मोठा धक्का
पीटीआयनं गुरूवारी बीसीसीआयच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकातून तो खेळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. महत्वाचं म्हणजे, जसप्रीत बुमराहला दुखापतीतून सावरण्यात 4 ते 6 महिने लागू शकतात. या दुखापतीमुळं जसप्रीत बुमराहला आशिया चषक 2022 स्पर्धेला मुकावं लागलं होतं. इंग्लंड दौऱ्यानंतर जसप्रीत बुमराह एनसीएमध्ये सतत प्रशिक्षण घेत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्यानं पुनरागमन केलं, तेव्हा असं वाटत होतं की आता सर्व काही ठीक आहे. परंतु, त्याच्या दुखापतीवरून असं दिसून येतंय की बुमराह पुनरागमन करण्यापूर्वी पूर्णपणे बरा झाला नव्हता. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय टी-20 संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चहर, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज. 


हे देखील वाचा-