Virender Sehwag Shoaib Akhtar Arabic Look : भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग हजरजबाबी वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आक्रमक शैलीप्रमाणे स्पष्टोक्ती वक्तव्यामुळे तो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. फक्त क्रिकेटच नाही तर इतर क्षेत्रातल्या घडामोडींवरही सेहवाग भाष्य करत असतो. पण आता वीरेंद्र सेहवाग वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. दुबईमध्ये एका सामन्यादरम्यान त्यानं केलेल्या पोषाखामुळे तो ट्रोल होतोय. वीरेंद्र सेहवाग याचा अरबी पेहरावातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सेहवागचा हा पेहराव अनेकांच्या पचनी पडला नाही. त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे.
ILT20 Final साठी दुबाईत पोहचला सेहवाग -
ILT20 Final साठी वीरेंद्र सेहवाग शनिवारी दुबईत पोहचला होता. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर एमआय एमिरेट्स आणि दुबई कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात त्याने समालोचन केलं. त्यावेळी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही त्याच्यासोबत होता. हे दोन्ही खेळाडू अरबी लूकमध्ये होते. दोघांनाही 'जुब्बा' घातला होता, जो इस्लामिक देशांमध्ये लोकप्रिय आहे. जे आयोजकांनी त्याला सामना सुरू होण्यापूर्वी घालायला लावले होते. याच पेहरावामुळे वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर ट्रोल होतोय. हा लूक शोएब अख्तर याला प्रचंड आवडलाय. त्यानं एक्सवर या हबीबी! ILT20 फायनलसाठी अरब फ्लेवरमध्ये तयार... असे लिहिलेय.
सोशल मीडियावर चर्चेला उधाण -
मात्र, सोशल मीडियावर सेहवागच्या लूकवरून चर्चेला उधाण आले होते. सेहवागला इंडियाचे नाव बदलून 'भारत' करायचे होते. आज तो अरबी पोशाख परिधान करतो, असा खोचक टोला एका युजरने लगावला आहे. तर अन्य एका यूजरने म्हटलेय की, ढोंगीपणा उघड! वीरेंद्र सेहवाग भारतीयांना राष्ट्रवाद आणि देशभक्तीबद्दल व्याख्यान देतो आणि तो UAE मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरसोबत कॉमेंट्रीचा आनंद घेत आहे.