Virat Kohli vs Sachin Tendulkar : विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आता विराट कोहलीच्या नावावर झाला आहे. 20 वर्षांपासून हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीने आठव्यांदा 50 धावसंख्या ओलांडत सचिन तेंडुलकरचा सचिन तेंडुलकरचा 2003 विश्वचषकातील रेकॉर्ड मोडलाय. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 674 धावा केल्या होत्या. 20 वर्षांनंतरही हा विक्रम विराट कोहलीने मोडला आहे. 


एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करम्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषक स्पर्धेत 673 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडणं कठीण वाटत होतं पण विराटने करुन दाखवले. 2019 मध्ये रोहित शर्मा या विक्रमाच्या जवळ पोहचला, पण मोडता आला नव्हता. पण आता विराटने सचिनचा विक्रम मोडला आहे. 


सचिनच्या शतकांचा विक्रमही निशाण्यावर - 
क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) वनडेतील शतकांच्या विक्रमाची रनमशीन विराट कोहलीने (Virat Kohli ) बरोबरी केली आहे. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांची वनडेमध्ये प्रत्येकी 49 शतके आहेत. आज विराट कोहलीला सचिनचा हा विक्रम मोडण्याची संधी आहे. वानखेडेच्या मैदानावर विराट कोहली शतकांचे अर्धशतक करणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत



कोणत्या विश्वचषकात कुणी सर्वाधिक धावा चोपल्या ?


1975 - ग्लेन टर्नर - न्यूझीलंड - 4 डावात 333 धावा


1979 - Gordon Greenidge - वेस्ट इंडिज - 4 डावात 253 


1983 - David Gower - इंग्लंड - 7 डावात 384 धावा 


1987 - ग्रहम गूच - इंग्लंड - 8 डावात 471 धावा


1992 - मार्टिन क्रो - न्यूझीलंड - 9 डावात 456 धावा


1996 - सचिन तेंडुलकर - इंडिया - सात डावात 523 धावा


1999 - राहुल द्रविड - इंडिया - 8 डावात 461 धावा


2023 - सचिन तेंडुलकर - इंडिया - 11 डावात 673 धावा


2007 - मॅथ्यू हेडन - ऑस्ट्रेलिया - 10 डावात 659 धावा


2011 - तिलकरत्ने दिलशान - श्रीलंका - 9 डावात 500 धावा


2015 - मार्टिन गप्टिल - न्यूझीलंड - 9 डावात 547 धावा 


2019 - रोहित शर्मा - इंडिया- 9 डावात 648 धावा 


2023 - विराट कोहली* - इंडिया -  10 डावात 674 धावा*


 
सचिन तेंडुलकरची वनडेमधील कामगिरी -


क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. सचिन तेंडुलकरने 452 वनडे डावात 44.8 च्या सरासरीने तब्बल 18 हजार 426 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने 49 शतके ठोकली आहेत. त्याशिवाय 96 अर्धशतकेही लगावली आहेत. यादरम्यान त्याने 195 षटकार आणि 2016 चौकारांचा पाऊस पाडला आहे. सचिन तेंडुलकर वनडेमध्ये 41 वेळा नाबाद राहिला आहे. सचिन तेंडुलकरची वनडेमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 200 धावा इतकी आहे. 


वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीची कामगिरी -



विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 290 सामने खेळले आहेत. यामधील 278 डावात त्याने 58.44 च्या सरासरीने आणि 93.54 च्या स्ट्राईक रेटने 13677 धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहलीच्या खात्यात आतापर्यंत 49 शतकांची नोंद आहे. तर 71 अर्धशतकेही विराटच्या बॅटमधून निघाली आहेत. विराट कोहलीने अतिशय कमी सामन्यात सचिनच्या सर्वाधिक शतकांची बरोबरी केली आहे.  


Virat Kohli vs Sachin Tendulkar Comparison,  सचिन आणि विराटची नेहमीच तुलना -


सचिन तेंडुलकरच्या विक्रमांची बरोबरी करणे कोणत्याही खेळाडूला अशक्य आहे, पण अनेक वेळा सध्या खेळणाऱ्या खेळाडूंची तुलना क्रिकेटच्या देवासोबत केली जाते. यामध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे, विराट कोहलीचं होय. स्वत: सचिन तेंडुलकरनेही माझा विक्रम विराट कोहली अथवा रोहित शर्मा मोडतील, असं वक्तव्य केले होते. विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा आणि शतकांचा पाऊस पडल्यानंतर अनेकांनी त्याची तुलना सचिन तेंडुलकरसोबत केली आहे. पण  या दोन दिग्गजांची तुलना करणं कठीण आहे, कारण दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या युगात राहत होते आणि दोघांच्या काळात क्रिकेटचा खेळ सारखा नव्हता.