Virat Kohli vs Mohammad Rizwan : भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना शानदार सुरुवात केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर एक लाख चाहत्यांसमोर विराट कोहलीने पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानला ट्रोल केले. झालं असे की, 73 धावसंख्येवर पाकिस्तानला दुसरा धक्का बसला. इमाम उल हक बाद होऊन तंबूत परतला. त्यामुळे मोहम्मद रिझवान फलंदाजीसाठी मैदानात आला. पण रिझवान याने खेळपट्टीवर फलंदाजीसाठी तयार  होण्यासाठी जास्त वेळ घेतला. कडाक्याच्या ऊन्हात फिल्डिंग करणाऱ्या विराट कोहलीला ही बाब खटकली. त्यामुळे विराट कोहलीने लाखभर लोकांसमोर रिझवान थेट घड्याळच दाखवलं. 


विराट कोहली याने रिझवानला ट्रोल केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. फक्त फोटोच नाही तर या प्रसंगाचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 






पाहा व्हिडीओ - 































भारतीय संघाने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. पाकिस्तानचे सलामी फलंदाज अब्दुलाह शफीक आणि इमाम यांनी दमदार सुरुवात केली. बुमराहच्या चेंडूला आदर दिला अन् सिराज याचा चांगलाच समाचार घेतला. दोघांची जोडी जमली असे वाटत असताच सिराजने अब्दुलाह याला तंबूचा रस्ता दाखवला. अब्दुलाह शफीक याने 24 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 20 धावांची खेळी केली. त्यानंतर इमाम याने मोर्चा संभाळला होता. इमाम याने वेगाने धावा करण्यास सुरुवात केली होती. पण हार्दिक पांड्या याने अचूक टप्प्यावर चेंडू टाक इमामला तंबूत धाडले. इमाम याने 38 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. पाकिस्तानचे दोन्ही अनुभवी फलंदाज सध्या मैदानावर आहेत. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान भारतीय गोलंदाजीचा संयमी सामना करत आहे. 28 षटकानंतर पाकिस्तान 2 बाद 144 धावा केल्या आहेत. बाबर आझम 45 आणि रिझवान 42 धावांवर खेळत आहेत.