Virat Kohli Shopping in leicester : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हटलं की जगातील अव्वल दर्जाचा क्रिकेटर. सध्या थोड्या खराब फॉर्ममध्ये असला तरी विराटची फॅन फोलीविंग काही कमी झालेली नाही. त्यामुळे भारतात कधी कुठे विराट दिसला तर त्याला पाहण्यासाठी किंवा त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची अगदी झुंबड उडते. पण विराट सध्या आगामी क्रिकेट दौऱ्यासाठी इंग्लंडमध्ये असून लीसेस्टर (leicester) येथे तो शॉपिंग करताना दिसून आला आहे.
विशेष म्हणजे ना बॉडीगार्ड ना चाहत्यांची गर्दी अशामध्ये निवांतपणे विराट यावेळी शॉपिंगचा आनंद घेत अगदी सामान्यांप्रमाणे दिसून आला. विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत त्यावर कमेंट्स देखील करत आहेत.
पाहा व्हिडीओ -
काही फॅन्सनी घेतले सेल्फी
विराटजवळ या ठिकाणी प्रचंड चाहत्यांची गर्दी झाली नसली तरी एक अव्वल दर्जाचा जागतिक क्रिकेटपटू असल्याने विराटला काही चाहत्यांनी नक्कीच ओळखत त्याच्यासोबत आवर्जून फोटो घेतला. विराटसोबतचे चाहत्यांचे फोटोही या व्हिडीओत दिसून आले आहेत.
आयपीएलमध्ये विराटचं सुमार प्रदर्शन
यंदाच्या आयपीएल हंगामात (ipl 2022) विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने 15 सामन्यात 22.73 च्या सरासरीने आणि 115.98 च्या स्ट्राईक रेटने 309 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 73 असून तो तीन वेळा शून्य धावा करुनही बाद झाला आहे.
हे देखील वाचा-