Virushka News: भारतातील प्रसिद्ध कपल म्हटलं तर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat kohli and Anushka Sharma). ज्यांना चाहते एकत्रितपणे विरुष्का (Virushka) असंही संबोधतात. दोघंही आपआपल्या क्षेत्रात लोकप्रिय असल्याने त्यांची कपल म्हणूनही चर्चा जोरदार असते. दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट तसंच विविध कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती चाहत्यांचं लक्ष वेधत असते. आतातर विराटने नुकताच अनुष्काचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला My World अर्थात माझं जग असं रोमॅंटिक कॅप्शन दिलं आहे.
या फोटोपुढे त्याने एक हार्टचा आणि पृथ्वीचा इमोजी ठेवल्यामुळे कॅप्शन आणखी Cute वाटत आहे. या फोटोंवर चाहतेही लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असून त्याने या फोटोवर लकी मॅन मेट (भाग्यवान आहेस मित्रा) अशी कमेंट केली आहे.
पाहा पोस्ट -
विराट-अनुष्का झाले अलिबागकर
विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. विराट कोहलीनं अलिबागजवळ झिराड येथे 8 एकर जागा खरेदी केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली या आठ एकर जागेवर फार्महाऊस बांधणार आहे. विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीनं याने 30 ऑगस्ट रोजी या जागेचे सर्व व्यवहार पूर्ण केले होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी सहा महिन्यापूर्वी झिराड येथील जागेची पाहणी केली होती. आपल्या व्यस्त कार्यक्रमामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना अलिबागमधील या जागेची खरेदी पूर्ण करण्यास वेळ नव्हता. त्यामुळे विराट कोहलीचा भाऊ विकास याने जागेची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आशिया कप 2022 मध्ये अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज
विराट कोहली सध्या दुबईमध्ये आशिया चषकामध्ये व्यस्त आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँग विरोधात विराट कोहलीनं दमदार फलंदाजी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजवाली. आशिया चषकात विराट कोहली अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. विराटने हाँगकाँगविरुद्ध 44 चेंडूत 59 धावा केल्या. यावेळी त्याने एक चौकार आणि 3 षटकार ठोकले. भारताने हा सामना 40 धावांनी जिंकला.
हे देखील वाचा-