Virat Kohli 1oth Class Marksheet : फलंदाजी करताना लक्षाचा पाठलाग करताना चेंडू आणि धावांचे गणित अचूक साधणारा विराट कोहली दहावीला गणितात कच्चा होता. होय... माजी कर्णधार विराट कोहलीचे दहावीचे मार्कशीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 2004 मध्ये विराट कोहली दहावी पास झाला होता, तेव्हाचे मार्कशीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 


विराट कोहलीने स्वत: कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दहावीचे मार्कशीट शेअर केले आहे. हे मार्कशीट पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसेल... कारण दहावीमध्ये विराट कोहलीला गणितात फक्त 51 गुण होते. विराट कोहलीने #LetThereBeSport या हॅशटॅगचा वापर करत दहावीचे मार्कशीट कू केले आहे. तो म्हणतो, ज्या गोष्टी तुमच्या मार्कशीटमध्ये कमीत कमी जोडतात, त्या तुमच्या चारित्र्याला अधिक कशा जोडतात हे मजेदार आहे. 


किंग कोहलीने शेअर केलेल्या दहावीच्या मार्कशीटमध्ये एकूण पाच विषय दिसतात. यामध्ये विराट कोहलीला सर्वात कमी गुण गणितात असल्याचे दिसतेय. इंग्रजीमध्ये विराट कोहलीला 83 गुण आहेत. तर हिंदीमध्ये विराट कोहलीला 75 गुण आहेत. तर विज्ञानमध्ये 55 गुण आहेत. समाजशास्त्र या विषयात विराट कोहलीला 81 गुण आहेत. गणितात विराट कोहलीला फक्त 51 गुण आहेत. धावांचे आणि चेंडूचे गणित परफेक्ट असणाऱ्या विराट कोहलीला दहावीला कमी गुण असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या जात आहेत. 


पाहा विराट कोहलीची पोस्ट -







विराट कोहलीचे दहावीचे मार्कशीट 28 जून 2004 रोजीचे आहे. विराट कोहलीचे शिक्षण सीबीएससीमध्ये झाले आहे. तर दिल्लीमधील Saviour convent sec A-2 Paschim vihar  मध्ये शिक्षणासाठी होता. विराट कोहलीची जन्मतारीख 5 नोव्हेंबर 1988 अशी आहे. 






विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळत आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत विराट कोहलीने शतक झळकावत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. मागील दोन वर्षांपासून विराट कोहलीची बॅट शांत होती. यंदा विराट कोहलीच्या फलंदाजीच्या जोरावर आरसीबी ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विराट कोहली सध्या तुफान फॉर्मात असल्याचे दिसत आहे.  


आणखी वाचा :  


IPL मध्ये आतापर्यंत 21 वेळा हॅट्ट्रिक! रोहितनं एकदा, युवीनं दोनदा केला करिश्मा; पाहा संपूर्ण यादी


आरसीबीला डबल धक्का! मॅक्सवेल-हेजलवूडच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह


IPL 2023 मध्ये रोहित शर्माला आराम दिला जाणार ? कोच मार्क बाऊचरने दिली हिंट


इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट पडणार, यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, जाणून घ्या सविस्तर 


IPL 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करणं सोपं नाही; पाहा ताकद आणि कमजोरी