Virat Kohli Retirement: टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विराटचं (Virat Kohli) वय आणि फिटनेस बघता तो आणखी काही वर्ष क्रिकेट खेळू शकत होता, पण त्याने आताच निवृत्ती का घेतली, इंग्लंड दौरा (India Vs England Test Series) तोंडावर असताना, तो मैदानात उतरेल अशी अपेक्षा होती. पण आधी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि आता विराट कोहलीनेही निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीअंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 कसोटी सामने खेळले गेले. मात्र, भारताला या मालिकेत 1-3 ने पराभवाचा सामना करावा लागला.
या मालिकेदरम्यान रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, आणि त्यानंतर 7 मे रोजी रोहित शर्मा आणि 12 मे रोजी विराट कोहली यांनीही निवृत्ती घेतली. न्यूझीलंडविरुद्ध 0-3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिकेतील पराभव, विराट आणि रोहित या दोघांचाही फारसा प्रभावी खेळ दिसून आला नाही. तिथूनच रोहित आणि विराटची निवृत्तीच्या घोषणेकडे वाटचाल सुरु झाल्याची चर्चा आहे.
Team India: विराटची निवृत्ती भारतीय संघासाठी मोठा धक्का
विराट कोहलीची निवृत्ती भारतीय क्रिकेटसाठी मोठा धक्का मानला जातोय. अनेकांना वाटत होतं की कोहली अजून काही वर्षे खेळू शकतो. पण त्याने अचानक निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिला. निवड समितीने भविष्यात त्यांना संघाबाहेर ठेवण्याचा अधिकार राखून ठेवला असला, तरी कोहलीचा सुमार फॉर्म हे एक कारण ठरू शकते. विराटने गेल्या 5 वर्षांत केवळ एक शतक झळकावले होते, आणि त्याची सरासरी 54 वरून 46 वर आली होती.
Virat Kohli: कोहलीने स्वतःहून हा निर्णय घेतला, BCCI चा हा निर्णय नव्हता
गेल्या काही महिन्यांत निवड समितीकडून मिळणाऱ्या सूचनांमुळेच विराटने आपल्या 14 वर्षांच्या करिअरला पूर्णविराम दिला. पण खरं काय झालं? एक व्यक्ती जो काही महिने आधी इंग्लंड दौऱ्याच्या तयारीत होता, त्याने अचानक टेस्ट क्रिकेटपासून दूर जाण्याचा निर्णय का घेतला? हे समजून घेण्यासाठी आपण मागच्या काही घडामोडी पाहणं आवश्यक आहे.
डिसेंबर 2024
8 डिसेंबर 2024 रोजी भारताने अॅडिलेड कसोटी तब्बल 10 विकेट्सने गमावली. यानंतर विराटला पुन्हा कर्णधार करण्याबाबत चर्चा सुरू झाली. मात्र, 30 डिसेंबरला मेलबर्न कसोटीतही भारताचा पराभव झाला आणि ट्रॉफी गमावली. मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर होता आणि फक्त एक सामना उरलेला होता. विराटच्या फॉर्मवरही प्रश्न उपस्थित झाले.
जानेवारी 2025
जानेवारीमध्ये विराटने रणजी ट्रॉफीत दिल्लीसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. विराटने दिल्लीच्या प्रशिक्षकाला सांगितले की, तो इंग्लंड दौऱ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याला पुन्हा कर्णधार व्हायचं होतं. त्याने शेवटच्या सिडनी कसोटीत जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत अंतरिम कर्णधारपदही भूषवलं होतं.
एप्रिल 2025
IPL दरम्यान निवड समितीसोबतच्या अनौपचारिक चर्चेत विराटला दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या. संघ आता तरुण कर्णधारासह पुढे जायला इच्छुक आहे आणि विराटची निवड आता इतर खेळाडूंप्रमाणेच कामगिरीवर आधारित असेल. यानंतरच विराटने इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतल्याची चर्चा आहे.
मे 2025
BCCI आणि जवळच्या खेळाडूंनी विराटला समजावण्याचा प्रयत्न केला, पण विराट आपल्या निर्णयावर ठाम होता. 12 मे 2025 रोजी विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
कोहलीने 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडेमधून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी टी20 पदार्पण केलं. त्यांचा क्रिकेट कारकीर्द 14 वर्षांहून अधिक काळ चाललेली असून त्यांनी भारतीय संघासाठी मोठं योगदान दिलं.
आणखी वाचा