Virat Kohli Rankings : विश्वचषकाचा रनसंग्राम सुरु असतानाच आयसीसीने वनडे फलंदाजीची क्रमवारी जारी केली आहे. ताज्या क्रमवारीनुसार, केएल राहुल आणि विराट कोहली यांना मोठा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार खेळी करणाऱ्या राहुल आणि विराट कोहली यांनी क्रमावारीमध्ये मोठी झेप घेतली आहे.  रोहित शर्माला मात्र एका गुणांचा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात रोहित शर्मा शून्यावर तंबूत परतला होता. आघाडीच्या 10 फलंदाजामध्ये भारताचे दोन फलंदाज आहे. शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे तर विराट कोहली सातव्या स्थानावर आहे. 


ऑस्ट्रेलियाविरोधात दमदार 85 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला गुणतालिकेत फायदा झाला आहे. विराट कोहली दोन क्रमांकाची बढती मिळाली आहे. विराट कोहली आता सातव्या स्थानावर विराजमान झाला आहे. विराट कोहलीच्या नावावर 715 अंक आहेत. रोहित शर्मा 11 व्या क्रमांकावर घसरला आहे. तर शुभमन गिल दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर आहे. बाबर आझम याला दोन्ही सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे शुभमन गिल आणि बाबर यांच्यातील अंतर फक्त 5 गुणांचे राहिले आहे. डेंग्यू झाल्यामुळे शुभमन गिल दोन सामन्यात उपलब्ध नव्हता. ऑस्ट्रेलियाविरोधात नाबाद 97 धावांची खेळी करणाऱ्या केएल राहुल याला 15 अंकाचा फायदा झाला आहे. केएल राहुल 19 व्या स्थानावर पोहचला आहे. 


















 आघाडीचे दहा फलंदाज - 


बाबर आझम, शुभमन गिल, रास वॅन डुसेन, हॅरी ट्रक्टर, डेविड वॉर्नर, क्विंटन डिकॉक, विराट कोहली, डेविड मलान, इम्मा उल हक, हेनरिक क्लासेन 


गोलंदाजीत कुलदीपला फायदा - 


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड गोलंदाजीत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. मोहम्मद सिराज दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. भारताच्या कुलदीप यादव याला मोठा फायदा झाला आहे. कुलदीप यादव याने आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराह 21 व्या स्थानावर आहे. मोहम्मद शामी 26 व्या क्रमांकावर होता.