Virat Kohli on MS Dhoni : भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या नावांपैकी दोन नावं म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni). दोघेही अव्वल दर्जाचे क्रिकेटर असून धोनी निवृत्त झाला असला तरी आजही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. तर विराटच्या फॅन्सची संख्याही कोट्यवधी आहे. अशामध्ये स्वत: कोहलीही एमएस धोनीचा फॅन आहे.


हे त्याने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून दिसत आहे. या स्टोरीमध्ये विराटने एका पाण्याच्या बॉटलचा फोटो पोस्ट केला असून त्या पाण्याची जाहिरात धोनी करत असल्याने धोनीचा फोटो त्या बॉटलवर आहे आणि कोहलीने धोनी सर्वत्र आहे, असं म्हणतच ही स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवर धोनी आणि विराट चाहत्यांसह क्रिकेट प्रेमी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.


विराटची इन्स्टाग्राम स्टोरी-




चाहतेही धोनी-विराट जोडीवर फिदा


विराटने ही स्टोरी टाकल्यावर नेटकरीही या स्टोरीला रिपोस्ट करत अनेक कमेंट्स करत आहेत. तसंच वेगवेगळे धोनी आणि विराट यांचे ऑनग्राऊंड तसंच मैदाना बाहेरील फोटोही व्हायरल होत आहेत. ज्याला भन्नाट कॅप्शन टाकत कोहली-धोनी फॅन्स पोस्ट शेअर करत आहेत. विशेष म्हणजे कोहलीच्या या एका स्टोरीनंतर एमएस धोनी ट्वीटरवर ट्रेंडमध्ये आला आहे. तर नेटकऱ्यांनी शेअर केलेले काही खास पोस्ट पाहूया...


















 


हे देखील वाचा-