T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. टी-20 विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक राहिले असता दिग्गज क्रिकेटपटू या स्पर्धेसाठी आपपल्या संघाच्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनची निवड करताना दिसत आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ यांनीही टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग इलेव्हनची निवड केलीय. त्यांच्या मते, विस्फोटक फलंदाज टीम डेव्हिडला ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळावी. याचबरोबर संघ व्यवस्थापनानं स्टीव स्मिथ किंवा मार्कस स्टॉयनिस यांपैकी एकाचा संघात समावेश करण्याचा विचार करावा, असाही सल्ला दिलाय. 


भारताविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात टिम डेविडला काही खास कामगिरी करता आली नाही. दोन्ही सामन्यात मिळून त्यानं फक्त 18 धावा केल्या. परंतु, तिसऱ्या सामन्यात विस्फोटक फलंदाजी अर्धशतक ठोकलं. ऑस्ट्रेलियासाठी टीम डेव्हिडची ही पहिली टी-20 मालिका होती. डेव्हिडनं सिंगापूरसाठी 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत टी-20 लीग हंगाम आणि इंडियन प्रीमियर लीगसह जगभरातील फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये त्यानं भाग घेतलाय. त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीनं गिलख्रिस्ट आणि वॉ या दोघांनाही प्रभावित केलंय.


गिलख्रिस्ट काय म्हणाला?
"टीम डेव्हिडला संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळायला हवी. तो ज्या पद्धतीने खेळतो आणि गेल्या 18 महिन्यांपासून आपण पाहिलंय. त्याचं संघात समावेश करणं विरोधी संघावर दबाव निर्माण करू शकतं.अखेरच्या 15-20 चेंडूत कशी फलंदाजी करायची आहे? हे त्याला चांगलं माहिती आहे."


मार्क वॉ काय म्हणाले?
"मी सध्या माझ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम डेव्हिडचा समावेश केला आहे. तो फॉर्म बदलू शकतो, पण माझ्यासाठी तो खूप चांगला संघ असेल." मात्र, डेव्हिडसाठी कोणाला सोडायचं? यावर या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये मतभेद आहेत. मार्क वॉने माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला त्याच्या सर्वोत्तम संघातून वगळलंय. तर, गिलख्रिस्टनं स्मिथला संघात ठेवले आणि मार्कस स्टॉयनिसला संघातून वगळलंय.


टी-20 विश्वचषकासाठी अॅडम गिलख्रिस्टची प्लेईंग इलेव्हन:
आरोन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टीम डेविड, पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेजलवुड.


टी-20 विश्वचषकासाठी मार्क वॉची प्लेईंग इलेव्हन:
आरोन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पैट कमिंस, मिशेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेजलवुड.


हे देखील वाचा-