Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा नवा-कोरा फोन हरवल्याची माहिती त्याने स्वत: ट्वीट शेअर करत दिली. विराटचं हे ट्वीट अगदी काही वेळातच तुफान व्हायरल झालं, ज्यानंतर नेटकऱ्यांसह अनेक बड्या कंपन्यांनी देखील रिप्लाय केला आहे. यात खासकरुन झोमॅटो, टाटा, झी5 अशा काहींचे रिप्लाय देखील व्हायरल होत आहेत.  विराटनं ट्वीटमध्ये लिहिलं की, 'तुमचा नवा फोन बॉक्समधून काढण्यापूर्वीच हरवणं, याहून वाईट काहीच नसेल, कोणी माझा फोन पाहिला का?' 

Continues below advertisement


विराटचं ट्वीट-






दरम्यान विराटच्या या ट्विटवर येणाऱ्या रिप्लायमध्ये झोमॅटोने लिहिलं आहे की, 'तुम्ही हवंतर आमच्याकडून आईसस्क्रीम मागवू शकता, वहिनींचा (Anushka Sharma) फोन यासाठी तुमची मदत करु शकतो. झोमॅटोच्या रिप्लायवर इतरही नेटकऱ्यांनी भन्नाट रिप्लाय दिले आहेत. तर टाटा निओने रिप्लायमध्ये लिहिलं आहे की, जे होणार असेल त्याला आपण काही करु शकत नाही, पण आम्हाला कोणता फोन होता ते थेट मेसेज करुन सांगा आमच्याकडे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर नथिंग या नव्याने मार्केटमध्ये आलेल्या मोबाईल कंपनीनेही विराटला फोन देऊ केला आहे. 















याशिवाय एका युजरने मिश्किलपणे लिहिलं आहे, आता यामुळे का होईना खेळावर लक्ष लागून राहिल.  तर अनेक नेटकरी हा एखादा स्टंट असून एखाद्या फोनच्या जाहिरातीचा याशी संबंध असेल असं म्हटलं जात आहे.  










हे देखील वाचा-