IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतीय संघ या सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच नवीन खेळाडूंना संधी देणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी केएस भरतला अंतिम 11 मध्ये संधी मिळू शकते. भरत देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. तो यष्टिरक्षक फलंदाज आहे. त्याचवेळी ईशान किशन याच नावही चर्चेत आहे. ईशानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता देखील आहे.
नागपूर कसोटीसाठी टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये केएस भरतचा समावेश करू शकते. तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. आंध्र प्रदेशच्या या खेळाडूने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 135 डावांमध्ये 4707 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 9 शतकं आणि 27 अर्धशतकं केली आहेत. त्याने लिस्ट ए च्या 64 सामन्यात 1950 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, ईशान किशनला गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील होण्याची शक्यता कमी आहे.
तीन फिरकीपटूंना घेऊन भारत उतरु शकतो मैदानात
भारतीय कॅम्प तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरू शकतो. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे प्लेईंग इलेव्हनचा भाग असू शकतात. या तिन्ही खेळाडूंमध्ये सामना पलटण्याची क्षमता आहे आणि त्यांची अलीकडची कामगिरीही चांगली झाली आहे. त्यामुळे त्यांची जागा जवळपास निश्चित झाली आहे. यासोबतच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे देखील प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकतात.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, केएस भरत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ (India’s squad for first 2 Tests vs Australia) -
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 9-13 फेब्रुवारी 2023 | नागपूर |
दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्माशाला |
चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
महत्त्वाच्या इतर बातम्या :