Rahul Dravid on Virat Kohli : भारतीय संघाचा (Team India) कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीमुळे दक्षिण आफ्रीका (South Africa) विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. त्यामुळे केएल राहुलने (KL Rahul) कर्णधारपद सांभाळलं. पण राहुलने कर्णधारपद भूषवलेली ही पहिली कसोटी भारताला 7 विकेट्सने गमवावी लागली. दरम्यान आता या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 11 जानेवारीपासून केपटाउन येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यात विराट खेळेल का? हा महत्त्वाचा प्रश्न असून राहुल द्रविडने याबाबत एक वक्तव्य केलं आहे.
केएल राहुलने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने नेट्समध्ये सराव करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान तिसऱ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात खेळण्यासाठी कोहली कर्णधार म्हणून मैदानात उतरणं गरजेचं असल्याचं तो म्हणाला. कर्णधार कोहली पाठीमध्ये दुखत असल्याने दुसरी टेस्ट खेळू शकला नाही.
काय म्हणाला द्रविड?
कोच द्रविड विराटबाबत म्हणाला की, 'विराट सध्यातरी फिट आहे आणि तो नेट्समध्ये सराव देखील करत आहे.' तसंच द्रविडने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या दुखापतीबद्दलही माहिती दिली. सिराजला दुसऱ्या सामन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. दुखापत असतानाही तो खेळत होता पण त्यामुळेच तो खास कामगिरी करु शकला नाही. पण आता सिराजलाही बरं वाटत आहे. पण इशांत आणि उमेश हे दोघे ऑप्शन आहेत, असंही द्रविड म्हणाला.
हे देखील वाचा-
- IND vs SA Test : रहाणे आणि पुजारा विश्वासावर खरे उतरले, सुनील गावस्कर यांचं दोघांना समर्थन
- Ind vs SA, 2nd Test, 4th Day Highlights: एल्गरच्या नाबाद 96 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा विजय, 7 विकेट्सनी सामना खिशात, मालिकेत 1-1 ची बरोबरी
- ICC Test Ranking : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकाचा राहुलला फायदा, कसोटी क्रमवारीत 58 क्रमाकांची उडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha