Virat Kohli Brand Value : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला आणखी एक मोठा झटका बसला आहे. किंग विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू घसरली आहे. तब्बल पाच वर्षांपासून विराट कोहली पहिल्या स्थानावर होता. यंदा रणवीर सिंह याने विराट कोहलीला पछाडत अव्वल स्थानावर कब्जा घेतला आहे. क्रॉल फर्मने नुकतेच लेटेस्ट ब्रँड व्हॅल्यू जारी केली आहे. यामध्ये विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचे समोर आले आहे. 2021 मध्ये विराट कोहली 185.7 मिलियन यूएस डॉलर होती, यामध्ये घसरण झाली असून ती ब्रँड व्हॅल्यू 176.9 मिलियन यूएई डॉलर इतकी झाली आहे. विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या तीन वनडे सामन्यात टीम इंडियाचा भाग आहे. बुधवारी 22 मार्च रोजी चेन्नईमध्ये निर्णायक सामना होणार आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात विराट कोहलीची बॅट शांतच होती. पहिल्या सामन्यात चार तर दुसऱ्या सामन्यात 31 धावा करता आल्या.
भारतात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्वू अभिनेता रणवीर सिंह याची झाली आहे. सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2022 च्या आकडेवारीनुसार, देशात सध्या रणवीर सिंह याची सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू आहे. रणवीर सिंह याची ब्रँड व्हॅल्यू 181.7 मिलियन यूएस डॉलर इतकी झाली आहे. रणवीर सिंह याने विराट कोहलीची पाच वर्षांपासूनची बादशात संपुष्टात आणली आहे. कर्णधारपदाला राजीनामा आणि त्यानंतर खराब फॉर्म यामुळे विराट कोहलीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये घसरण झाली आहे. 2020 मध्ये किंग विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 237 मिलियन यूएस डॉलर इतकी होती. तर 2021 85.7 मिलियन यूएस डॉलर झाली. यंदा यामध्ये आणखी घसरण पाहायला मिळाली. सध्या विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 176.9 मिलियन यूएई डॉलर इतकी झाली आहे.
धोनी सहाव्या क्रमांकावर तर सचिन आठव्या स्थानावर -
सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट्स 2022 मध्ये टॉप 10 भारतीयांमध्ये माजी कर्णधार एमएस धोनी आणि सचिन तेंडुलकर यांची नावे आहेत. माजी कर्णधार धोनी सहाव्या क्रमांकावर आहे. धोनीची ब्रँड व्हॅल्यू 8.03 कोटी आहे. तर या यादीत सचिन तेंडुलकर आठव्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरची ब्रँड व्हॅल्यू 7.36 कोटी इतकी आहे. रणवीर सिंह पहिल्या तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत खिलाडी अक्षय कुमार 153 मिलियन डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर आलिया भट्ट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. आलियाची ब्रँड व्हॅल्यू 102.9 मिलियन डॉलर इतकी आहे. पाचव्या क्रमांकावर दीपिका पादुकोण असून तिची ब्रँड व्हॅल्यू 82.9 मिलियन डॉलर इतकी आहे.