Kohli on Srivalli Dance Step: भारत आणि वेस्टइंडीज (India vs West Indies) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानात पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात भारत 44 धावांनी विजयी झाला. दरम्यान या सामन्याच्या विजयासह मालिकेत विजयी आघाडीचा आनंद होताच, पण त्याचवेळी माजी कर्णधार विराच कोहली पुन्हा एकदा मैदानात थिरकाना दिसल्याने त्याचे फॅन्स आनंदी झाले. विराट अनेकदा मैदानात भारत सामना जिंकत आल्यानंतर एकदम आनंदी मूडमध्ये मजा-मस्ती करत असतो. मग कधी अनिल कपूरच्या स्टेपवर थिरकणारा विराट आता दाक्षिणात्य सिनेमा पुष्पामधील श्रीवल्ली गाण्याप्रमाणे स्टेप्स करताना दिसला. पण विराटचा हा डान्स इतरांप्रमाणे नसून त्याच्या स्वत:च्या हटके स्टाईलमध्ये होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.




भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात विराट कोहली खास कामगिरी करु शकलेला नाही. पहिल्या सामन्यात त्याने आठ तर दुसऱ्या सामन्यात 18 धावाच केल्या आहेत. त्यामुळे विराटच्या शतकाची प्रतिक्षा अजून लांबणीवर गेली आहे. आता तिसऱ्या सामन्यात युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी विराट विश्रांती घेण्याचीही शक्यता आहे.


मालिकेत भारताची विजयी आघाडी


दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND Vs WI 2nd ODI) भारताने 44 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही भारताने दोन सामने जिंकत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामन्यात भारतानं 50 षटकात 9 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजच्या संघासमोर 238 धावांचं लक्ष्य ठेवलं ज्यानंतर वेस्ट इंडिजला 193 धावांत सर्वबाद करत भारताने 44 धावांनी सामना जिंकला.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha