IND vs WI 2nd ODI Rohit Sharma Virat Kohli : बारबाडोस येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघात आज मोठे बदल करण्यात आले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली प्लेईंग 11 मध्ये नाहीत. उप कर्णधार हार्दिक पांड्या याच्याकडे आज टीम इंडियाचे नेतृत्व आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जागी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले. प्लेईंग 11 समोर आल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबतच्या चर्चेला उधाण आले. या दोघांना का घेतले नाही? असा सवाल उपस्थित होतोय. नाणेफेकीवेळी हार्दिक पांड्या याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
काय म्हणाला हार्दिक पांड्या ? Hardik Pandya, India captain
नाणेफेकीनंतर हार्दिक पांड्याला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. हार्दिक पांड्या म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली सतत क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे त्या दोघांनाही आराम देण्यात आला आहे. यामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ते एकदम फ्रेश मैदानात उतरतील.
संजू,अक्षर यांना संधी -
दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. संजू सॅमसन बर्याच दिवसांनी परतला आहे. त्याला पहिल्या वनडेत संधी देण्यात आली नाही. यावरून सॅमसनच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर बोर्डावर टीका केली. पण आता सॅमसन प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. त्याच्यासोबत अक्षर पटेलही दुसऱ्या वनडेत मैदानात उतरणार आहे.
भारतीय संघाची प्लेईंग 11 -
शुभमन गिल, ईशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि उमरान मलिक
वेस्ट इंडिजची प्लेईंग 11
ब्रँडन किंग, काइल मेयर्स, एलिक एथनाज, शाय होप (विकेटकीपर/कर्णधार), शिमरोन हेटमायर, कीसी कार्टी, रोमारियो शेफर्ड, यानिक कारिया, गुडाकेश मोती, अल्ज़ारी जोसेफ, जेडन सील्स
आणखी वाचा :
रोहित-विराटला आराम, हार्दिक कर्णधार; संजूला संधी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11