India vs West Indies 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. बारबाडोस येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने पाच विकेटने विजय मिळवला होता. भारतीय गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 114 धावांत गारद झाला होता. पण 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक उडाली होती. ईशान किशन याचा अपवाद वगळता एकाही फलंदाला अश्वासक फलंदाजी करता आली नव्हती. आता दुसऱ्या वनडे सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूने वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरेल. तर यजमानांना या सामन्यात पराभूत करत मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने रोहित शर्मा आणि टीम मैदानावर उरणार, यात शंकाच नाही.


शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जाडेजा, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांचं स्थान निश्चित मानले जातेय.  गोलंदाजीमध्येही फारसा बदल होईल, अशी शक्यता नाही. शार्दूल ठाकूर, मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांचं स्थान निश्चित मानले जातेय. जयदेव उनादकट याला बेंचवरच बसावे लागणार आहे. चहल आणि अक्षर पटेल यांना स्थान मिळण्याची शक्यता नाहीच. 


संजू सॅमसनला संधी मिळणार का?


पहिल्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसन याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलं नव्हते. या सामन्यात संजूलला स्थान देणार की नाही, असा सवाल चाहत्यांना पडला आहे. पहिल्या वनडे सामन्यात ईशान किशन याने दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे ईशानची जागा फिक्स मानली जात आहे. सूर्यकुमार यादव याने फलंदाजीत निराश केले होते. त्यामुळे सूर्याच्या जागी संजूला स्थान मिळणार का ? असा सवाल उपस्थित केला जातोय. 


रोहित शर्मा आणि शुभमन गिल करणार डावाची सुरुवात 



पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल असेल, यात शंकाच नाही. त्यामुळे यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे बेंचवर बसतील. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल. गेल्या काही दिवसांत शुभमन गिलने एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने द्विशतक झळकावले आहे. रोहित शर्मा आणि गिल सलामीला उतरणार तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल.


 


पहिल्या वनडेसाठी कसा असेल भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव/संजू सॅमसन, ईशान किशन(विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार. 


भारतीय संघ कसा आहे... 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार), शार्दुल ठाकुर, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, उमरान मलिक आणि मुकेश कुमार. 


वनडे मालिकेचं वेळापत्रक - 


पहिला वनडे- 27 जुलै- कँसिंग्टन ओवल, बारबाडोस  - भारतीय संघाने 5 विकेटने विजय मिळवला.


दुसरा वनडे- 29 जुलै- कँसिंग्टन ओवल, बारबाडोस


तिसरा वनडे- 1 ऑगस्ट- ब्रायन लारा क्रिकेट एकेडमी, त्रिनिदाद.