IND vs WI Live Update: वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा याला आराम देण्यात आलाय. हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी मैदानात उतरला होता. रोहित शर्माशिवाय विराट कोहली यालाही दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आराम देण्यात आला आहे. 


भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आराम देण्यात आला आहे. संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. वेस्ट इंडिजच्या संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. अल्जारी जोसेफ याला संधी दिली आहे. रोवमन पॉवेल याला बाहेर बसवण्यात आलेय. 


बारबाडोस येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने पाच विकेटने विजय मिळवला होता. भारतीय गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 114 धावांत गारद झाला होता. पण 115 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक उडाली होती. ईशान किशन याचा अपवाद वगळता एकाही फलंदाला अश्वासक फलंदाजी करता आली नव्हती. आता दुसऱ्या वनडे सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूने वेस्ट इंडिजचा संघ मैदानात उतरेल. तर यजमानांना या सामन्यात पराभूत करत मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना आराम दिला आहे. अक्षर पटेल आणि संजू सॅमसन यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. 


भारतीय संघाची प्लेईंग 11 - 


शुभमन गिल, ईशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि उमरान मलिक 


वेस्ट इंडिजची प्लेईंग 11 


ब्रँडन किंग, काइल मेयर्स, एलिक एथनाज, शाय होप (विकेटकीपर/कर्णधार), शिमरोन हेटमायर, कीसी कार्टी, रोमारियो शेफर्ड, यानिक कारिया, गुडाकेश मोती, अल्ज़ारी जोसेफ, जेडन सील्स