भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मंधाना तिच्या फलंदाजीसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. अनेक मंधानाच्या फलंदाजीची तुलना माजी कर्णधार सौरव गांगुलीशीही केली जाते. फलंदाजीशिवाय स्मृती मंधाना तिच्या सौंदर्यासाठी देखील खूप लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिचो लाखो चाहते आहेत. अलीकडेच, मंधाना तिच्या एका ट्विटवरुन पुन्हा चर्चेत आली आहे.


महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाच्या सौंदर्यचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर नेहमीच त्याला वैयक्तिक प्रश्न विचारतात. स्मृती मंधानाचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या लग्नाबाबत तिला विचारण्यात आले होते. विराट नवीन नावाच्या वापरकर्त्याने मंधानाला विचारले की, तुम्ही प्रेम विवाह करणार की अरेंज? याला मंधानाने जबरदस्त उत्तर दिले आहे. मंधानाने वापरकर्त्याला उत्तर दिले की, "लव-अरेंज म्हणजेच मंधाना आधी प्रेम करणार आणि नंतर दोन्ही कुटूंबांना पटवून लग्न करणार.






स्मृती मंधाना अवघ्या 24 वर्षांची आहे. त्यामुळे अजून तिच्या लग्नाला वेळ आहे. सध्या मंधानाचे संपूर्ण लक्ष क्रिकेटवर आहे. मंधाना सध्या इंग्लंड दौर्‍यावर आहे. मंधानाने टीम इंडियाकडून 58 एकदिवसीय सामने, 78 टी -20 आणि 3 कसोटी सामने खेळले आहेत. मंधाना एकदिवसीय सामन्यात सरासरी 41 च्या वर असून तिने 2204 धावा केल्या आहेत. मंधानाने फलंदाजी करताना 4 एकदिवसीय शतके केली आहेत. तर टी -20 मध्ये मंधानाने 25.45 च्या सरासरीने 1782 धावा केल्या आहेत. टी -20 मध्ये मंधानाच्या नावावर 12 अर्धशतके आहेत.