Virat Kohli : आशिया चषकाच्या सुपर ४ फेरीतील अखेरचा सामना भारत आणि बांगलादेश या संघामध्ये कोलंबोत सुरु आहे. अखेरच्या साखळी सामन्यात टीम इंडियाने सिनिअर खेळाडूंना आराम दिलाय. दिग्गज विराट कोहलीलाही बांगलादेशविरोधात आराम देण्यात आलाय. पण विराट कोहली वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिला. बांगलादेशविरोधात वॉटरबॉय झालेला विराट कोहली चर्चेत आहे. विराट कोहलीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 


 ड्रिंक्स घेऊन येतानाचा विराट कोहलीचा मजेदार अंदाज सोशल मीडियावर चर्चेत आहे. सर्वजण विराट कोहलीच्या या अंदाजाच्या प्रेमात पडलेत. विराट कोहली सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. प्रत्येकजण विराट कोहलीच्या या नव्या अवताराबद्दल चर्चा करत आहे. अनेकांनी विराट कोहलीचे कौतुक केलेय. 


 विराट कोहलीचे खेळाडूला पाणी घेऊन जातानाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.  ज्यामध्ये विराट कोहली मजेशीर शैलीत मैदानाकडे चालताना दिसत आहे. मोहम्मद सिराजही विराट कोहलीच्या मागे धावत आहे. कोहलीची ही फनी अंदाज चाहत्यांना खूप आवडलाय. विराट कोहली वॉटर बॉय बनून मॅचचा भरपूर आनंद घेत आहे.


























भारतीय संघात पाच बदल - 


आशिया चषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात रोहित शर्माने पाच खेळाडूंना आराम देण्यात आलाय. आशिया चषकात काही खेळाडूंना प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे बेंच स्ट्रेंथ तपासून पाहण्यासाठी प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे. विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना आराम देण्यात आलाय. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, मोहम्मद शामी, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दूल ठाकूर यांना प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेय. 


श्रेयसला स्थान नाहीच -