India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium Rajkot) होणार आहे. पाच सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी राजकोट (IND vs ENG) कसोटी सामना महत्वाचा ठरणार आहे. या महत्वाच्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता कमी आहे. भारतीय संघ राजकोटमध्ये दाखल झालाय, पण संघासोबत जसप्रीत बुमराह नसल्याचं समोर आले आहे. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराह सतत सराव सत्रामध्ये गैरहजर राहिलाय. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी बुमराह उपलब्ध राहणार का? असा प्रश्न उपस्थित राहिलाय. मध्यक्रम फलंदाजांचामध्ये अनुभवाची कमी असल्यामुळे भारतीय संघ चार गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
सहा दिवसांच्या ब्रेकनंतर भारतीय संघ 11 फेब्रुवारीमध्ये राजकोट येथे दाखल झाला. तेव्हापासूनच भारतीय संघाने सरावास सुरुवात केली. पण आतापर्यंत जसप्रीत बुमराह भारतीय संघासोबत जोडला नाही. क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, बुधवारी जसप्रीत बुमराह सराव सत्रात सहभागी होऊ शकतो. सुरुवातीच्या रिपोर्ट्सुनासर, जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटी सामन्यात आराम दिला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय. पण दुसऱ्या कसोटीनंतर दहा दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे बुमराह राजकोटमध्ये खेळण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय. आज याबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. जर तिसऱ्या कसोटीत बुमराह खेळला तर चौथ्या कसोटीत त्याला आराम दिला जाऊ शकतो, असाही काही जणांचा अंदाज आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार का? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळत नाही. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या अनुपस्थितीत भारताची फलंदाजी कमकुवत दिसतेय. अशा स्थितीतीमध्ये भारतीय सरफराज खान अथवा देवदत्त पड्डीकल यांना पदार्पणाची संधी णिळू शकतो. अशा स्थितीमध्ये भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरु शकतो. रवींद्र जाडेजाही दुखापतीमधून सावरलाय. त्याशिवाय दोन वेगवान गोलंदाज खेळवतील. मोहम्मद सिराज याचं प्लेईंग 11 मधील निश्चित मानले जातेय. बुमराहच्या खेळण्यावर सस्पेन्स कायम आहे.
इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, , रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पड्डीकल.
टीम इंडिया Vs इंग्लंड टेस्ट सीरीजचं शेड्यूल
1st टेस्ट : 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजय)
2nd टेस्ट : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम (टीम इंडियाचा 106 धावांनी विजय)
3rd टेस्ट : 15-19 फेब्रुवारी, राजकोट
4th टेस्ट : 23-27 फेब्रुवारी, रांची
5th टेस्ट : 7-11 मार्च, धर्मशाला