India vs England 3rd Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium Rajkot) होणार आहे. पाच सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी राजकोट (IND vs ENG)  कसोटी सामना महत्वाचा ठरणार आहे. इंग्लंड संघाने एक दिवस आधीच तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग 11 ची घोषणा केली आहे. इंग्लंडने प्लेईंग 11 मध्ये एक बदल केलाय. इंग्लंडने शोएब बशीर याला प्लेईंग 11 मधून बाहेर बसवलेय. 


इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अधिकृत संकेतस्थळावर प्लेईंग  11 ची माहिती दिली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं राजकोट कसोटी सामन्यापूर्वी आपल्या संघाची घोषणा केली आहे. फिरकी गोलंदाज शोएब बशीर याला आराम देण्यात आलाय. त्याच्या जागी मार्क वूड याला संधी देण्यात आली आहे. भारतीय फलंदाजांना आता जेम्स अँडरसन आणि मार्क वूड यांचा सामना करावा लागणार आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याचा राजकोट कसोटी सामना 100 वा असेल. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. 


मार्क वूडची कामगिरी कशी राहिली ?


इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. 32 कसोटी सामन्यात 104 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान चार वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम ेकलाय. मूड याने तळाला फलंदाजीत योगदानही दिलेय. त्याच्या नावावर एका अर्धशतकाची नोंद आहे.  


शोएब बशीर संघाबाहेर -


इंग्लंड संघाने शोएब बशीर या युवा फिरकी गोलंदाजाला संघाबाहेर ठेवलेय. त्याच्या जागी मार्क वूड याला संधी देण्यात आली आहे. बशीर याला बाहेर बसवण्यात आल्याचं कारण सांगण्यात आले नाही. 


भारताविरोधात इंग्लंडची प्लेईंग 11 - England Men's XI


1. जॅक क्रॉली Zak Crawley
2. बेन डकेट Ben Duckett
3. ओली पोप Ollie Pope
4. जो रुट Joe Root
5. जॉनी बेयरस्टो Jonny Bairstow
6. बेन स्टोक्स Ben Stokes (C)
7.  बेन फोक्स Ben Foakes
8.रेहान अहमद Rehan Ahmed
9. टॉप हर्टली Tom Hartley
10. मार्क वूड Mark Wood
11. जेम्स अँडरसन James Anderson


इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा स्क्वॉड 


रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, , रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पड्डीकल.









1st टेस्ट : 25-29 जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड 28 धावांनी विजय) 
2nd टेस्ट : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टनम (टीम इंडियाचा 106 धावांनी विजय) 
3rd टेस्ट : 15-19 फेब्रुवारी, राजकोट 
4th टेस्ट : 23-27 फेब्रुवारी, रांची 
5th टेस्ट : 7-11 मार्च, धर्मशाला