England tour of Australia: इंग्लंडविरुद्ध तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय (Australia vs England) मिळवून ऑस्ट्रेलियानं मालिका खिशात घातली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) 92 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं इंग्लंडसमोर 281 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 38.5 षटकात 208 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात पॅट कमिन्सला विश्रांती दिली असून जोश हेझलवूड ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व करत होता.


ट्वीट-






 


स्टीव्ह स्मिथची जबरदस्त खेळी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदनात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं 43 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी चौथ्या विकेटसाठी 101 धावांची महत्वाची भागेदारी केली. लॅबुशेन 58 धावा करून बाद झाला. पण त्यानंतर स्टीव्ह स्मिथनं मार्शसोबत पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागेदारी केली. स्मिथ 94 धावांची शानदार खेळी खेळून बाद झाला. मार्शनंही 50 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडकडून आदिल रशीदनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्स आणि डेव्हिड विलीला प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. तर, मोईन अलीच्या खात्यात एक विकेट जमा झाली.


ऑस्ट्रेलियाची भेदक गोलंदाजी
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. मिचेल स्टार्कनं पहिल्याच षटकात इंग्लंडच्या संघाला दोन धक्के दिले. इंग्लंडनं 34 धावांत तीन विकेट्स गमावले. त्यानंतर जेम्स विन्स आणि सॅम बिलिंग्सनं चौथ्या विकेट्ससाठी 122 धावांची महत्वाची भागेदारी केली. विन्स 60 धावा करून बाद झाला. त्यानंतर इंग्लंडचे एकामागून एक फलंदाज बाद होत गेले. इंग्लंडच्या संघानं 169 धावांवर सात विकेट्स गमावले. खालच्या फळीतील फलंदाजांना क्रिजवर टिकता आलं नाही आणि इंग्लंडचा संपूर्ण संघ 38.5 षटकात ऑलआऊट झाला. 


हे देखील वाचा-