Umesh Yadav in County Championship : भारतीय क्रिकेटर उमेश यादव (Umesh Yadav) सध्या टीम इंडियामध्ये नसल्याचं दिसून येत आहे. एक महत्त्वाचा वेगवान गोलंदाज असूनही यादव वनडे, टी20 आणि टेस्ट अशा कोणत्याच फॉर्मेटमध्ये  भारतीय टीममध्ये नाही. यादवने आयपीएल 2022  मध्ये दमदार प्रदर्शन केलं. पण त्यानंतरही इंग्लंड दौऱ्यात त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. पण आता त्याला एक मोठी जबाबदारी मिळाली असून तो आता थेट काऊंटी चॅम्पियनशिपच्या (County Championship) रॉयल लंडन वनडे कपमध्ये मिडलसेक्समध्ये (Middlesex)  खेळणार आहे.  


भारतासाठी 52 कसोटी सामने खेळला आहे उमेश यादव


उमेश यादव भारतीय संघातील एक उत्तम गोलंदाज असून आतापर्यंत 52 कसोटी सामने तो भारतीय संघातून खेळला आहे. या 52 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 158 विकेट्स आपल्या नावे केले आहेत. या दरम्यान उमेश यादवने 133 धावा देत 10 विकेट्स घेण्याचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये या वेगवान गोलंदाजाने 3 वेळा 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. तर एका सामन्यात 10 विकेट्स देखील पटकावले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये उमेश यादवचं बोलिंग अॅव्हरेज 30.8  इतक आहे.


वनडे आणि टी20 मध्येही उमेशचं दमदार प्रदर्शन


उमेशने आतापर्यंत 75 वनडे सामन्यांसह 7 टी20 सामने देखील खेळले आहेत. यावेळी उमेश यादवने 75 वनडे सामन्यात (ODI Matches) 106 विकेट्स घेतले आहेत. तर यावेळी 31 धावा देत 4 विकेट्स घेणं त्याचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरलं आहे. वनडेमध्ये उमेशची इकॉनमी 6.01 असून बोलिंग अॅव्हरेज 33.63 इतकं राहिलं आहे.


हे देखील वाचा-