U19 Asia Cup 2025 Semifinal Schedule : अंडर-19 आशिया कप 2025 चा ग्रुप राऊंड आता संपला असून, सेमीफायनलचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. शेवटच्या दोन साखळी सामन्यांपूर्वीच चारही सेमीफायनललिस्ट निश्चित झाले होते. मात्र, सेमीफायनलमध्ये कोणाचा सामना कोणाशी होणार, याबाबत संभ्रम होता. बांगलादेशने श्रीलंकेवर मिळवलेल्या विजयामुळे हा सस्पेन्सही अखेर संपला आहे. 

Continues below advertisement

ग्रुप ‘अ’ मधून भारत आणि पाकिस्तान यांनी सेमीफायनलसाठी पात्रता मिळवली होती. तर ग्रुप ‘ब’ मधून बांगलादेश आणि श्रीलंका या संघांनी अंतिम चारमध्ये प्रवेश केला. ग्रुप ‘अ’ मध्ये भारताने अव्वल स्थान पटकावले, तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर राहिला. दुसरीकडे, ग्रुप ‘ब’ मध्ये बांगलादेशने पहिला क्रमांक मिळवला आणि श्रीलंका उपविजेता ठरला.

सेमीफायनल कोणाता संघ कोणाशी भिडणार? 

Continues below advertisement

स्पर्धेच्या नियमानुसार, ग्रुप ‘अ’ मधील अव्वल संघाचा सामना ग्रुप ‘ब’ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी, तर ग्रुप ‘ब’ मधील अव्वल संघाचा सामना ग्रुप ‘अ’ मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी होतो. त्यानुसार भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. पाकिस्तानची लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या दोन्ही सेमीफाइनलमधील विजेते संघ 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात आमनेसामने येतील.

सेमीफायनलचे संपूर्ण वेळापत्रक (U19 Asia Cup 2025 Semifinal Schedule)

पहिला सेमीफायनल सामना : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka)19 डिसेंबर, दुबई - आयसीसी अकॅडमी ग्राउंड, सकाळी 10.30 वाजता (IST)

दुसरा सेमीफायनल : पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (Pakistan vs Bangladesh)19 डिसेंबर, दुबई - द सेव्हन्स स्टेडियम, सकाळी 10.30 वाजता (IST)

भारत–पाकिस्तान फायनल होण्याची शक्यता

बुधवारी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात झालेला सामना अत्यंत निर्णायक ठरला. या सामन्यात बांगलादेशने बाजी मारत विजय मिळवला. या निकालामुळे ग्रुपमध्ये बांगलादेश अव्वल क्रमांकावर पोहोचला, तर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर राहिला. या निकालानंतर सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले असून, सेमीफाइनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा थेट सामना होणार नाही. ग्रुपमधून पात्र ठरलेले भारत आणि पाकिस्तान हे सेमीफायनलमध्ये दुसऱ्या ग्रुपमधील संघांविरुद्ध खेळणार आहेत.

त्यानुसार, भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे, तर पाकिस्तानची लढत बांगलादेशविरुद्ध होईल. मात्र, दोन्ही संघांनी आपापले सेमीफायनल सामने जिंकले, तर 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे. आता सर्वांचे लक्ष सेमीफायनलवर खिळले असून, भारत–पाकिस्तान फायनलचे स्वप्न साकार होते का, याकडे क्रिकेटविश्व उत्सुकतेने पाहत आहे.

अंडर 19 आशिया कप 2026 उपांत्य फेरीचे थेट प्रक्षेपण

भारत विरुद्ध श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 आशिया कप 2026 उपांत्य फेरीचे थेट प्रक्षेपण विविध स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल, तर भारतीय चाहते जिओहॉटस्टारवर अंडर 19 आशिया कप उपांत्य फेरीचे थेट प्रक्षेपण पाहू शकतील.

हे ही वाचा -

Lionel Messi Vantara : कपाळावर गंध, गळ्यात रुद्राक्षांची माळ, अंबानींच्या वनतारात मेस्सी महादेवाचा भक्त झाला, पाहा शंकराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करतानाचे PHOTOS