Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा सामना नेपाळच्या संघासोबत आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर टीम इंडियाची जबाबदारी असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळाला होता. आता मंगळवारपासून टीम इंडिया आशियाई क्रीडा स्पर्धेत सुरुवात करत आहे. ऋतुराज गायकवाडच्या संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा सर्वच क्रीडा चाहत्यांना आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाने महिला क्रिकेट स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेय. आता ऋतुराज गायकवाडच्या संघाचा सुवर्णपदक पटकावण्याचा नंबर असेल. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता भारत आणि नेपाळ यांच्यातील लढत होईल.
नेपाळ क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. नेपाळच्या फलंदाजाने अवघ्या नऊ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याशिवाय सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही केला. इतकेच काय तर टी20 मध्ये सर्वाधिक धावा चोपण्याचा पराक्रमही नेपाळ संघाने केला आहे. पण आता नेपाळसमोर तगड्या टीम इंडियाचे मजबूत आव्हान असेल.
भारताशिवाय पाकिस्तान संघानेही क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. पाकिस्तानचा सामना हाँगकाँग संघासोबत असेल. तर श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. अखेरचा आणि चौथा क्वार्टर फायनल सामना बांगलादेश आणि मलेशिया संघामध्ये होणार आहे. पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. भारतीय संघाने उप उपांत्य फेरीत नेपाळचा पराभव केल्यास उपांत्य फेरीत भारतापुढे बांगलादेश आणि मंगोलिया यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि नेपाळचे संघ -
भारत- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, अवेश खान , अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू : यश ठाकुर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन.
Ruturaj Gaikwad (c), Mukesh Kumar, Shivam Mavi, Shivam Dube, Prabhsimran Singh (wk), Yashasvi Jaiswal, Rahul Tripathi, Tilak Varma, Rinku Singh, Jitesh Sharma (wk), Washington Sundar, Shahbaz Ahmed, Ravi Bishnoi, Avesh Khan, Arshdeep Singh.
नेपाळ- रोहित पौडेल (कर्णधार), करण केसी, प्रैटिस जीसी, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, गुलशन झा, सोमपाल कामी, सुदीप जोरा, बिनोद भंडारी, कुशल भुर्टेल, दीपेंद्र सिंह ऐरी, ललित राजबंशी, बिबेक कुमार यादव, अभिनाश बोहरा, संदीप लामिछाने.