Team India Vs South Africa 1st Test: टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. सेंच्युरियन इथे होणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांवर पावसाचं सावट आहे. तर त्यानंतरचे तीन दिवस हवामानात सुधारणा अपेक्षित आहे. वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय मालिका भारतानं आधीच जिंकली आहे. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाची 31 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज (26 डिसेंबर) आफ्रिकेच्या घरच्या मैदानावर सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी आज भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सेंच्युरियनमध्ये खेळली जाईल. भारतीय क्रिकेट संघानं आपल्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे 31 वर्षांपासूनचा दुष्काळ संपवण्याची मोठी संधी टीम इंडियाकडे आहे.
टीम इंडिया 1992 पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे, परंतु त्यांनी आजपर्यंत एकही मालिका जिंकलेली नाही. टीम इंडियानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकूण 8 द्विपक्षीय कसोटी मालिका खेळल्या आहेत. यापैकी 7 पराभूत झाल्या आहेत, तर 1 अनिर्णित राहिली आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका नववी कसोटी मालिका
एकूण 15 द्विपक्षीय कसोटी मालिका दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेल्या. यापैकी टीम इंडियानं फक्त 4 मालिका जिंकल्या आहेत आणि 8 मालिका गमावल्या आहेत. तर, 3 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. पण यावेळी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्यासाठी 31 वर्षांची प्रतीक्षा संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. 36 दिवसांपूर्वी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीतील पराभवाची निराशा विसरून भारतीय क्रिकेट संघाला मोठी कामगिरी करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे.
आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब
त्याआधी भारतीय चाहत्यांसाठी काही धक्कादायक आकडे समोर येत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ 1992 पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे, परंतु, त्यांनी आजपर्यंत एकही मालिका जिंकलेली नाही. या काळात सचिन तेंडुलकर, कपिल देव आणि सौरव गांगुली यांच्यासारखे महान खेळाडू आणि कर्णधार झाले आहेत. पण आफ्रिकेत मालिका जिंकून कोणालाही इतिहास रचता आला नाही.
मात्र, यावेळी रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय क्रिकेट संघानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकूण 8 द्विपक्षीय कसोटी मालिका खेळल्या आहेत. यापैकी 7 मालिकांमध्ये पराभव झाले आहेत, तर 1 मालिका अनिर्णित राहिली. दरम्यान, एकूण 15 द्विपक्षीय कसोटी मालिका दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेल्या. यापैकी टीम इंडियानं फक्त 4 मालिका जिंकल्या आहेत, तर 8 मालिका गमावले आहेत. तसेच, 3 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेत दोन्ही संघांमधील कसोटी मालिकांमधील रेकॉर्ड
एकूण कसोटी मालिका : 8
दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकला: 7
टीम इंडिया जिंकली : 0
ड्रॉ : 1
ओवरऑल टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकांमधील रेकॉर्ड
एकूण कसोटी मालिका : 15
दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकला : 8
टीम इंडिया जिंकली : 4
ड्रॉ : 3
कसोटी सामन्यांमध्ये आफ्रिकेमध्ये टीम इंडियाचा फारसा दबदबा नाही
जर दोन्ही संघांमधील कसोटी सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला, तर यामध्येही भारतीय क्रिकेट संघाचा फारसा दबदबा दिसून आलेला नाही. टीम इंडियानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर एकूण 23 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 4 सामने जिंकेल आहेत, तर 12 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. तर 7 सामन्यांमध्ये ड्रॉ झाला आहे. दरम्यान, एकूण, दोन्ही संघांमध्ये एकूण 42 कसोटी सामने झाले, ज्यापैकी टीम इंडियानं 15 जिंकले आणि 17 गमावले. 10 सामने अनिर्णित राहिले होते.
कसोटी मालिकेसाठी दोन्ही देशांचा स्क्वॉड
टीम इंडिया टेस्ट स्क्वॉड :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड़, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा आणि केएस भरत (विकेटकीपर).
दक्षिण आफ्रिकेची टेस्ट स्क्वॉड :
टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्जी, टोनी डी जोरजी, डीन एल्गर, मार्को जानसेन, केशव महाराज, एडेन मार्करम, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरेने.
महत्त्वाच्या इतर बातम्या :