T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किएराॅन पोलार्ड टी20 विश्वचषक 2024 मध्ये इंग्लंडला धडे देणार आहे. या स्पर्धेसाठी त्याची इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोचिंग स्टाफमध्ये पोलार्ड असल्यामुळे इंग्लंडच्या संघाला स्थानिक परिस्थितीचा चांगला फायदा घेता येईल. पुढील T20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतच होणार आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडला आपल्या कोचिंग स्टाफमध्ये T20 स्पेशालिस्टला स्थान द्यावे लागले ज्याला येथील स्थानिक परिस्थितीची माहिती आहे. सध्या पोलार्डपेक्षा चांगला टी-20 स्पेशालिस्ट असूच शकत नाही.






पोलार्ड T-20 चा मोठा खेळाडू


पोलार्ड 2012 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. 2021 च्या टी२० विश्वचषकातही त्याने वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने विंडीजसाठी एकूण 101 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे पण तरीही तो फ्रँचायझी क्रिकेटमध्ये हात आजमावताना दिसत आहे.






पोलार्डने अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली अबुधाबी T10 लीगमध्ये न्यूयॉर्क स्ट्रायकर्सला चॅम्पियन बनवले. त्याने त्याचा संघ त्रिनबागो नाइट रायडर्सला कॅरेबियन प्रीमियर लीग 2023 च्या अंतिम फेरीत नेले. आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये तो मुंबई इंडियन्स एमिरेट्सचा कर्णधारही आहे. यासोबतच तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षकही आहे.


टी-20 आणि वनडेमध्ये इंग्लंडचा संघ फ्लॉप 


वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ गतविजेता म्हणून प्रवेश करेल. टी-20 चॅम्पियन इंग्लंड सध्या वनडे आणि टी-20 या क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये फ्लॉप ठरत आहे. 2023 च्या वनडे विश्वचषकात ते 9 पैकी फक्त 3 सामने जिंकू शकले.नशिबाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पात्र ठरू शकले. अलीकडेच त्यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेतही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.


T20 विश्वचषक 2024 कधी खेळला जाईल?


पुढील T20 विश्वचषक आयपीएल 2024 नंतर खेळवला जाईल. ही स्पर्धा 4 ते 30 जून दरम्यान होणार आहे. या कालावधीत सर्व सामने सात कॅरेबियन आणि तीन अमेरिकन ठिकाणांवर खेळवले जातील.


इतर महत्वाच्या बातम्या