India vs South Africa Test Series Schedule : टी 20 आणि वनडे मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघ कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. 26 डिसेंबर पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल? याची चर्चा सुरु आहे. भारताचा दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.  


सुनील गावस्करांनी आपल्या प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी दिली ?


सुनील गावस्करांच्या मते, केएल राहुल याला भारतीय संघात विकेटकिपर म्हणून स्थान द्यायला हवे. केएल राहुल याच्याशिवाय केएस भरत हाही स्पर्धेत आहे. ईशान किशन याने कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर त्याच्या जागी केएस भरतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. सुनील गावस्कर यांनी पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी शुभमन गिल याची निवड केली आहे. तर विराट कोहली त्याच्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.  यानंतर सुनील गावस्करच्या संघात केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि रवी अश्विन आहेत.


सुनील गावस्कर यांनी निवडलेली प्लेईंग 11 


सलामी फलंदाज - रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल


टॉप ऑर्डर- शुभमन गिल आणि विराट कोहली


मिडिल ऑर्डर- श्रेयस अय्यर आणि केएल राहुल (विकेटकीपर)


अष्टपैलू - रवींद्र जडेजा आणि रवि अश्विन


गोलंदाज - मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज


लिटिल मास्टर अर्थात सुनील गावस्कर यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. गावस्करांनी शार्दुल ठाकूर याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही. दरम्यान,  मोहम्मद शमी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला होता. मोहम्मद शमी घोट्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज खेळतील असे मानले जात आहे, परंतु मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. त्याशिवाय मुकेश कुमारही खेळण्याची शक्यता आहे. एका जागेसाठी चार जणांमध्ये स्पर्धा असेल.... 


कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया -


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, यशस्वी जायसवाल, अभिमन्यू ईश्वरन, रवि अश्विन, रवींद्र जडेजा, केएल राहुल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा. 


दक्षिण आफ्रिकेचा संघ - 


टेंबा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोर्जी, डीन एल्गर, एडन मार्करम, कीगन पीटरसन, मार्को यानसेन, वियान मुल्डर, डेविड बेडिंघम, ट्रेस्टन स्टब्स, काइल वॅरेनी, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्जी, केशव महाराज, लुंगी नगिदी आणि कगिसो रबाडा.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात  बॉक्सिंग डे कसोटी 


1992 - दक्षिण आफ्रिका vs भारत (पोर्ट एलिजाबेथ) - दक्षिण आफ्रिकाने 9 विकेटने जिंकला
1996 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - दक्षिण आफ्रिकाने 328 धावांनी विजय मिळवला.
2006 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - दक्षिण आफ्रिकाने 174 धावांनी जिंकला.
2010 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - भारताने 87 धावांनी सामना जिंकला.
2013 - दक्षिण आफ्रिका vs भारत (डरबन) - दक्षिण आफ्रिकाने 10 विकेटने सामना जिंकला
2021 - दक्षिण आफ्रिका vs भारत (सेंचुरियन) - भारताने 113 धावांनी सामना जिंकला.