India vs South Africa, IND vs SA 2nd T20I Score: दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाची (Indian Cricket Team) सुरुवात खराब झाली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना संघाने 5 विकेटने गमावला. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे नाणेफेक न होता रद्द करण्यात आला होता. अशा स्थितीत आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना 14 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे.


पावसानं व्यत्यय आणलेल्या या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 15 षटकांत 152 धावांचं लक्ष्य होतं. प्रत्युत्तरात यजमान संघाने अवघ्या 13.5 षटकांत 5 गडी गमावून सामना जिंकला. या सामन्यात रीझा हेंड्रिक्सनं 27 चेंडूत 49 धावांची खेळी केली. तर कर्णधार एडन मार्करामने 17 चेंडूत 30 धावा केल्या.


दक्षिण आफ्रिकेचे विकेट्स : (154/5, 13.5 ओवर्स)


पहिली विकेट : मॅथ्यू ब्रीटजके (16), विकेट : रनआउट (41/1) 
दुसरी विकेट : एडेम मार्करम (30), विकेट : मुकेश कुमार (96/2) 
तीसरी विकेट : रीजा हेंड्रिक्स (49), विकेट : कुलदीप यादव (108/3) 
चौथी विकेट : हेनरिक क्लासेन (7), विकेट : मोहम्मद सिराज (108/4) 
पांचवां विकेट : डेविड मिलर (17), विकेट : मुकेश कुमार (139/5)


सूर्या आणि रिंकू सिंहचं तडाखेबंद अर्धशतक


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेक गमावून सर्वात आधी फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघानं 19.3 षटकांत 7 विकेट्स गमावत 180 धावा केल्या होत्या. यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि त्यानंतर आफ्रिकेला 15 षटकांचं लक्ष्य देण्यात आलं. टीम इंडियाच्या डावांत रिंकू सिंहनं 39 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. तर कर्णधार सूर्यकुमार यादवनं 36 चेंडूत 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. रिंकूनं त्याच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक 30 चेंडूत झळकावलं. तर सूर्यानं या सामन्यात 29 चेंडूत अर्धशतक झळकावलं. सूर्यानं आपल्या खेळीत 3 षटकार आणि 5 चौकार लगावले. तर रिंकूनं 2 षटकार आणि 9 चौकार लगावलेत. सूर्यासोबत रिंकू सिंहनं चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झीनं सर्वाधिक 3 बळी घेतले आहेत.


टीम इंडियाचे विकेट्स : (180/7, 19.3 ओवर्स) 


पहली विकेट : यशस्वी जायसवाल (0), विकेट : मार्को जानसेन (0/1) 
दुसरी विकेट: शुभमन गिल (0), विकेट : लिजाद विलियमस (6/2) 
तिसरी विकेट: तिलक वर्मा (29), विकेट : गेराल्ड कोएत्जी (55/3) 
चौथा विकेट: सूर्यकुमार यादव (56), विकेट : तबरेज शम्सी (125/4) 
पांचवी विकेट: जितेश शर्मा (1), विकेट : एडेन मार्करम (142/5) 
सहावी विकेट: रवींद्र जडेजा (19), विकेट : गेराल्ड कोएत्जी (180/6) 
सातवी विकेट: अर्शदीप सिंह (0), विकेट : गेराल्ड कोएत्जी (180/7)


'या' 4 स्टार प्लेयर्सना प्लेईंग 11 मध्ये जागाच नाही


भारतीय क्रिकेट टीममध्ये ईशान किशन, श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई यांना जागाच मिळाली नाही. दुसरीकडे, स्टार स्पिनर गोलंदाज केशव महाराजला दक्षिण आफ्रिका संघात स्थान मिळालेलं नाही. या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करत आहेत. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मायदेशातील टी-20 मालिकेतही त्यानं कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. या मालिकेतही भारतीय क्रिकेट संघानं 4-1 असा दमदार विजय मिळवला होता.


टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11


टीम इंडियाची प्लेईंग 11 


यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार. 


दक्षिण अफ्रीकेची प्लेईंग 11 


रीजा हेंड्रिक्स, मॅथ्यू ब्रीटजके, एडेन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियमस आणि तबरेज शम्सी.