IPL 2024 Schedule in Details: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पुढच्या महिन्यात 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होत आहे. यंदा आयपीएलचं (IPL 2024) संपूर्ण सीझन 17 दिवसांत पार पडणार असून या 17 दिवसांत तब्बल 21 सामने खेळवले जाणार आहेत. हे 21 सामने 10 शहरांमध्ये खेळवले जातील. आयपीएल 2024 मधील पहिला सामना 22 मार्च रोजी रात्री 8 वाजता महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डू प्लेसिसच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे.
KKR खेळणार सर्वात कमी सामने, दिल्लीत एकही सामना नाही
22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलचा उद्घाटनाचा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. बीसीसीआयनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, क्रिकेट चाहत्यांना या 17 दिवसांत एकूण चार डबल हेडर पाहायला मिळतील. डबल हेडर म्हणजे, एका दिवसांत दोन सामने खेळवले जातील. आयपीएलचे संध्याकाळचे समाने 7.30 वाजल्यापासून, तर दुपारचे सामने 3.30 वाजल्यापासून खेळवले जातील.
आयपीएल सीझनच्या पहिल्या 17 दिवसांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) चे संघ जास्तीत जास्त 5-5 सामने खेळतील. तर चेन्नई सुपर किंग्स (CSK), सनरायझर्स हैदराबाद (SRH), मुंबई इंडियन्स (MI), राजस्थान रॉयल्स (RR), लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्स (PBKS) हे प्रत्येकी चार सामने खेळतील. तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) फक्त तीन सामने खेळणार आहे.
यंदाच्या आयपीएल शेड्यूलची खास गोष्ट म्हणजे, ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स वायझॅकमध्ये (विशाखापट्टणम) आपला पहिला सामना खेळणार आहे. तर इतर संघांचे सामनेही त्यांच्या होम ग्राउंडवर होणार आहेत. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकांमुळे दिल्लीत सामने खेळवण्यात येणार नसल्याचं बोललं जात आहे.
आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या 21 सामन्यांचं शेड्यूल
- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8 वाजता
- पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वाजता
- कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30 वाजता
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
- गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स, 25 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
- चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
- सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, संध्याकाळी 7.30 वाजता
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स, 30 मार्च, लखनऊ, संध्याकाळी 7.30 वाजता
- गुजरात टायटन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, दुपारी 3.30 वाजता
- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, वाइजैग, संध्याकाळी 7.30 वाजता
- मुंबई इंडियंस विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 3 एप्रिल, वायझॅग, संध्याकाळी 7.30 वाजता
- गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स, 4 एप्रिल, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
- राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 6 एप्रिल, जयपूर, संध्याकाळी 7.30 वाजता
- मुंबई इंडियंस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
- लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता
धोनीची चेन्नई पाचवेळा विजेती
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएल 2023 चं विजेतपद पटकावत, पाचव्यांदा अजिंक्यपदाचा मान मिळवला होता. चेन्नईने अंतिम फेरीत हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईच्या रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता.
| सीझन | विजेता | उपविजेता |
| 2008 | राजस्थान रॉयल्स | चेन्नई सुपर किंग्सचा 3 विकेट्सनी पराभव |
| 2009 | डेक्कन चार्जर्स | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 विकेट्सनी पराभव |
| 2010 | चेन्नई सुपर किंग्स | मुंबई इंडियन्सचा 22 धावांनी पराभव |
| 2011 | चेन्नई सुपर किंग्स | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 58 धावांनी पराभव |
| 2012 | कोलकाता नाईट रायडर्स | चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सनी पराभव |
| 2013 | मुंबई इंडियन्स | चेन्नई सुपर किंग्सचा 23 धावांनी पराभव |
| 2014 | कोलकाता नाईट रायडर्स | पंजाब किंग्सचा 3 विकेट्सनी पराभव |
| 2015 | मुंबई इंडियन्स | चेन्नई सुपर किंग्सचा 41 धावांनी पराभव |
| 2016 | सनरायझर्स हैदराबाद | रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा 8 धावांनी पराभव |
| 2017 | मुंबई इंडियन्स | रायझिंग पुणे सुपरजायंटचा 1 धावेनं पराभव |
| 2018 | चेन्नई सुपर किंग्स | सनरायझर्स हैदराबादचा 8 विकेट्सनी पराभव |
| 2019 | मुंबई इंडियन्स | चेन्नई सुपर किंग्सचा 1 धावेनं पराभव |
| 2020 | मुंबई इंडियन्स | दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनी पराभव |
| 2021 | चेन्नई सुपर किंग्स | कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव |
| 2022 | गुजरात टायटन्स | राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्सनी पराभव |
| 2023 | चेन्नई सुपर किंग्स | गुजरात टायटन्सचा पाच विकेट्सनी पराभव |
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2024 Schedule : आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, 22 मार्चला चेन्नईत पहिला सामना, मुंबईचा सामना कधी?