Team India Playing-11 vs England 3rd Test Match: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळवल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज (15 फेब्रुवारी 2024) राजकोटमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यासाठी प्लेईंग 11 निवडणं कर्णधार रोहित शर्मासाठी आव्हान होतं. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल प्लेईंग 11 मध्ये नसणार आहेत. तर, आजच्या सामन्यात दोन नवख्या खेळाडूंना पदार्पणची संधी मिळाली आहे. आजच्या सामन्यात सरफराज खान आणि ध्रुव जुरेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, दोघेही विकेटकिपर आहेत. 


इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही टीम इंडियाचं रनमशीन असलेला दिग्गज विराट कोहली खेळणार नाही. त्यानं वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. केएल राहुल, श्रेयस अय्यर दोघेही आजच्या सामन्यात खेळणार नाहीत. श्रेयस अय्यरला खराब फॉर्ममुळे बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर, केएल राहुल इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात संघात पुनरागम करू शकतो. 






आजच्या सामन्यात दोघांना पदार्पणाची संधी


टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत प्लेईंग इलेव्हन ठरवणं रोहितसमोर मोठं आव्हान होतं. आजच्या सामन्यासाठी संघात सरफराज खानला संधी मिळाली आहे. सरफराजसाठी आजचा कसोटी सामना पदार्पणाचा सामना आहे. तसेच, विकेटकिपर केएस भरत तसा फारसा फॉर्मात नाही, त्यामुळे त्याच्याऐवजी ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली आहे. ध्रुवसाठीही आजचा सामना पदार्पणाचा सामना आहे. म्हणजेच, आजच्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघात दोन नवख्या खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. दुसरीकडे, स्टार ऑलराउंडर रवींद्र जाडेजानंगी दुखापतीनंतर संघात कमबॅक केलं आहे. 


जाडेजा, बुमराहचं कमबॅक 


आजच्या कसोटी सामन्यात जाडेजानं कमबॅक केलं आहे. राजकोट म्हणजे, जाडेजाचं घरचं मैदान. त्यामुळे जाडेजाचं संघात असणं टीम इंडियासाठी नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. जाडेजाच्या पुनरागमनामुळे अक्षर पटेलला प्लेईंग 11 मधून वगळलं आहे. तसेच, जसप्रीत बुमराहचाही प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. 


राजकोट कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.


राजकोट कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग 11


जॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स एंडरसन.