Team India vs England 3rd Test Match: टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG Test Series) 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये (Rajkot) खेळवला जाणार आहे. या मैदानावर तब्बल 8 वर्षांनंतर या दोन्ही संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी टीम इंडिया आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात नोव्हेंबर 2016 मध्ये राजकोटमध्ये कसोटी सामना खेळला गेला होता.
तब्बल 8 वर्षांपूर्वी खेळलेला हा सामना दोन्ही संघांमधील बरोबरीत सुटला होता. राजकोटमध्ये खेळवला गेलेला हा सामना सर्वाधिक धावसंख्येचा होता, ज्यात इंग्लंडनं पहिल्या डावात 537 धावा फटकावल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 3 बाद 260 धावा करुन डाव घोषित केला. तर भारतीय क्रिकेट संघानं पहिल्या डावात 488 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात भारतीय संघ 6 विकेट्सवर केवळ 172 धावा करू शकला आणि दिवस संपला. त्यामुळे यावेळीही राजकोटच्या खेळपट्टीवर हाय स्कोअरिंग सामना अपेक्षित आहे.
वेस्ट इंडिजचा दारुन पराभव
टीम इंडियानं या मैदानावर आतापर्यंत फक्त 2 कसोट्या खेळल्या आहेत. इंग्लंडनंतर वेस्ट इंडिजशी सामना झाला. ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या त्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं कॅरेबियन संघाचा डाव आणि 272 धावांच्या फरकानं पराभव केला होता. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पृथ्वी शॉनं 134 धावा, विराट कोहलीनं 139 धावा आणि रवींद्र जाडेजानं नाबाद 100 धावा केल्या.
अशाप्रकारे टीम इंडिया राजकोटच्या मैदानावर आतापर्यंत एकही कसोटी हरलेली नाही. याशिवाय या मैदानात इंग्लंडचा पराभव करणं अवघड काम आहे. मात्र, यावेळी विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यरसारखे खेळाडू नाहीत. पण रोहित शर्मा आणि जाडेजा इंग्लंडचा पराभव करू शकतात.
इंग्लंडच्या प्लेईंग 11 मार्क वुडचं पुनरागमन
इंग्लंडनं राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11 जाहीर केला आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळलेला वेगवान गोलंदाज मार्क वूडनं पुनरागमन केलं आहे. विशाखापट्टणममध्ये पदार्पण कसोटी खेळणाऱ्या शोएब बशीरला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. एकूणच, तिसऱ्या कसोटीसाठी बेन स्टोक्सनं केलेला हा एकमेव मोठा बदल आहे. अशा परिस्थितीत आता इंग्लंडच्या संघात 2 वेगवान गोलंदाज आणि 3 स्पिनर्स असतील. मार्क वुड आता जेम्स अँडरसनसह वेगवान गोलंदाज म्हणून संघाचं नेतृत्व करेल. फिरकी टोळीत रेहान अहमद, टॉम हार्टले आणि जो रूट यांचा समावेश असेल.
राजकोट कसोटीसाठी इंग्लंडची संभाव्य प्लेईंग 11
जॅक क्रॉउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स एंडरसन.
राजकोट कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल/केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/मुकेश कुमार आणि मोहम्मद सिराज.