IND vs SA T20 Series : आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार असून यासाठी क्रिकेट जगतातील 16 संघ सज्ज झाले आहेत. भारतीय संघाचा फॉर्म पाहता टीम इंडिया स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान या भव्य स्पर्धेपूर्वी भारत दक्षिण आफ्रिकेशी (IND vs SA) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. विश्वचषकाच्या दृष्टीनं ही मालिका टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष यासामन्याकडे लागून आहे. तर या मालिकेबद्दलची सर्व माहिती पाहूया...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (India vs South Africa) यांच्यात टी20 मालिकेला उद्या अर्थात 28 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 ऑक्टोबर आणि तिसरा सामना 4 ऑक्टोबररोजी रंगणार आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही संघाचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास पाहता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 7 द्विपक्षीय टी-20 मालिका खेळले आहेत. यापैकी भारतानं तीन मालिका जिंकल्या आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दोन मालिकेत विजय मिळवता आलाय. यातील दोन मालिका अनिर्णित ठरल्या आहेत. 

भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक: 

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 28 सप्टेंबर 2022 तिरुवनंतपुरम 
दुसरा टी-20 सामना 2 ऑक्टोबर 2022 गुवाहाटी
तिसरा टी-20 सामना 4 ऑक्टोबर 2022 इंदूर

कधी, कुठे पाहाल सामना?

या मालिकेतील सर्व सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कशी असू शकतो भारतीय संघ?

विश्वचषकाच्यादृष्टीनं अत्यंत महत्त्वाची असणारी ही मालिका दोन्ही संघासाठी तितकीच महत्त्वाची आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाविजय भारताने मिळवल्यामुळे भारतीय संघ अधिक बदल करणार नाही अशी आशा आहे. पण स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याला विश्रांती दिल्यामुळे त्याच्याजागी संघात आलेल्या शाहबाज अहमदला कदाचित संधी दिली जाऊ शकते किंवा भुवनेश्वर कुमारलाही विश्रांती देऊन अर्शदीपला संधी मिळू शकते.

कशी असू शकते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह.

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.

हे देखील वाचा-