Indian Cricket Team, Asia Cup 2023 : मोठ्या वादानंतर अखेर आशिया चषक श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तानमध्ये चार तर उर्वरित 9 सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर यादरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. आज आशिया चषकाचे वेळापत्रक जारी करण्यात आलेय.  आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय.. कारण, त्यानंतर दोन महिन्यात वनडे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे यंदाच्या आशिया चषकावर कोण नाव कोरणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. आशिया चषकाच्या इतिहासावर नजर मारल्यास सर्वात यशस्वी संघ टीम इंडिया आहे. 

1984 पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत 15 वेळा आशिया चषक स्पर्धा पार पडलीय. भारतीय संघ आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. भारतानं आतापर्यंत सर्वाधिक वेळा म्हणजेच सात वेळा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं सहा वेळा आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. या यादीत पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांना दोन वेळा आशिया चषक जिंकता आला आहे.  1984, 1988, 1990, 1995 भारताने आशिया चषकावर नाव कोरलेय. 1997 मध्ये श्रीलंकेनं आशिया चषकावर नाव कोरले होते. पाकिस्तानने 2000 मध्ये पहिल्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. 

 आशिया चषक विजेत्या संघाची यादी:

क्रमांक वर्ष विजयी संघ
1 1983/84 भारत
2 1985/86 श्रीलंका
3 1988/89 भारत
4 1990/91  भारत
5 1994/95  भारत
6 1997 श्रीलंका
7 2000  पाकिस्तान
8 2004  श्रीलंका
9 2008 श्रीलंका
10 2010  भारत
11 2011/12 पाकिस्तान
12 2013/14  श्रीलंका
13 2016  भारत (टी-20)
14 2018 भारत
15 2022 श्रीलंका

 

यंदा आशिया कप एकदिवसीय स्वरुपात

यावेळची आशिया कप स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असून एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी आशिया कप स्पर्धेच्या एका गटात भारत, पाकिस्तानसह नेपाळ हा संघ असेल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत. यामध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये 6 सुपर 4 सामने होणार आहेत. 

आशिया चषकाचे संपूर्ण वेळापत्रक

तारीख फेरी सामना ठिकाण
30 ऑगस्ट 2023 1 पाकिस्तान vs नेपाळ मुल्तान, पाकिस्तान
31 ऑगस्ट 2023 1 बांगलादेश vs श्रीलंका कँडी, श्रीलंका
2 सप्टेंबर 2023 1 पाकिस्तान vs भारत कँडी, श्रीलंका
3 सप्टेंबर 2023 1 बांगलादेश vs अफगाणिस्तान  लाहोर, पाकिस्तान
4 सप्टेंबर 2023 1 भारत vs नेपाळ  कँडी, श्रीलंका
5 सप्टेंबर 2023 1 श्रीलंका vs अफगाणिस्तान लाहोर, पाकिस्तान
6 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs B2 लाहोर, पाकिस्तान
9 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) B1 vs B2 कँडी, श्रीलंका
10 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs A2 कँडी, श्रीलंका
12 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका
14 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A1 vs B1  दांबुला, श्रीलंका
15 सप्टेंबर 2023 2 (सुपर - 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका
17 सप्टेंबर 2023  फायनल S4 1 vs S4 2 कोलंबो, श्रीलंका