IND vs SL, 2nd T20 : भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरु टी20 मालिकेतील दुसरा सामना भारताने 16 धावांनी गमावला आहे. ज्यामुळे तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. सामन्यात भारतीय संघासमोर सामना जिंकण्यासाठी 207 धावांचे लक्ष्य होते, पण टीम इंडियाला 20 षटकात 8 विकेट गमावत 190 धावाच करता आल्या. कर्णधार दाशून शनाका हा श्रीलंकेच्या संघाच्या विजयाचा हिरो ठरला. शनाकाने 22 चेंडूंत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने नाबाद 56 धावा केल्या. तर गोलंदाजीत 1 षटकात 4 धावा देऊन 2 खेळाडू देखील बाद केले. त्यामुळे शनाकाला सामनावीराचा खिताब देण्यात आला. दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मात्र पराभवामुळे निराश झाला आणि त्याने सामन्यानंतर आपली प्रतिक्रिया देत कुठे चूक झाली ते देखील सांगतिलं...


या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ''गोलंदाजीशिवाय आम्ही फलंदाजीतही चुका केल्या. पॉवरप्ले आमच्यासाठी चांगला गेला नाही. आम्ही साध्या-साध्या चुका केल्या, ज्या या टप्प्यावर होऊ नयेत, पण आम्ही आमच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करू. मैदानावर तुमचा दिवस वाईट असू शकतो, पण तुम्ही त्यातूनही चांगली कामगिरी करु शकता.'' भारतीय गोलंदाजांवर हार्दिक पांड्या म्हणाला की, ''आम्ही बरेच नो बॉल टाकले. यासाठी तुम्ही कोणालाही दोष देऊ शकत नाही, नो-बॉल टाकणं हा गुन्हा नाही. यासोबतच हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादवचे कौतुक देखील केले.


अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांची तुफानी खेळी


भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर अक्षर पटेलने (Axar Patel) 31 चेंडूत सर्वाधिक 65 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 36 चेंडूत 51 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार मारले. शिवम मावीने 15 चेंडूत 26 धावांची तुफानी खेळी केली, पण संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊ शकला नाही. श्रीलंकेकडून रजिथा, दिलशान मधुशंका आणि दशून शनाका यांनी 2-2 विकेट घेतल्या.


हे देखील वाचा-