Sanju Samson : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर संजू सॅमसनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'ऑल इज वेल, लवकरच भेटू'. संजू सॅमसनची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एकीकडे ऋषभ पंत टीम इंडियाचा भाग नाही. यामुळे संजू सॅमसनला संधी मिळेल असे वाटत होते, पण तोही दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाची चिंता वाढली होती. पण आता संजूच्या या पोस्टमुळे तो लवकरच मैदानात उतरेल अशी आशा आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात संजू सॅमसन प्लेईंग इलेव्हनचा भाग होता, पण दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडला आहे. मात्र, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, संजू सॅमसन न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी तंदुरुस्त होणार आहे. त्याचवेळी बीसीसीआयने संजू सॅमसनच्या दुखापतीवर एक निवेदन देखील जारी केले आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, संजू सॅमसन न्यूझीलंड मालिकेपर्यंत दुखापतीतून सावरेल. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना संजू सॅमसनला दुखापत झाली होती. यामुळे यष्टीरक्षक फलंदाजाला संपूर्ण मालिकेतून बाहेर व्हावे लागले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता.
बीसीसीआय मेडिकल टीम काय म्हणाली?
बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यानंतर मुंबईत संजू सॅमसनच्या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यात आले. या स्कॅननंतर वैद्यकीय पथकाने संजू सॅमसनला विश्रांतीचा सल्ला दिला. त्याच वेळी, वैद्यकीय पथकाने सांगितले की संजू सॅमसन पुढील 4-6 आठवड्यात दुखापतीतून बरा होईल. विशेष म्हणजे भारतीय संघ टी-20 मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.
हे देखील वाचा-