IND vs NZ: टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) सुपर-12 फेरीत भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज 'करो या मरो'ची लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा पत्कारावा लागला होता. त्यामुळे उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हा सामना जिंकणे दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर, न्यूझीलंडच्या संघाची जबाबदारी केन विल्यमसनच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. भारतीय संघ गेल्या 18 वर्षांपासून आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध विजयी मिळवू शकला नाही. यामुळे आजचा सामना खूपच अधिक रोमहर्षक होण्याची अपेक्षा आहे. कारण, दोन्ही संघांकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत, जे सामना बदलण्यासाठी सक्षम आहेत. 


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 चा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.00 वाजता नाणेफेक होईल. यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच 7.30 वाजता या सामन्याला सुरवात होईल. भारत-न्यूझीलंड सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या हिंदी आणि इंग्रजी चॅनेलवर केले जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स वन एचडी, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे. याशिवाय, डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे. याशिवाय, www.abplive.com वर या सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्स मिळवता येणार आहेत. 


संघ- 
भारतीय संभाव्य संघ: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वरुण सीव्ही, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह


न्यूझीलंड संभाव्य इलेव्हन: मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, केन विल्यमसन (कर्णधार), जेम्स नीशम, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (विकेटकीपर), मिचेल सँटनर, ईश सोधी, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट


 संबंधित बातम्या-