Team India Meeting PM Modi Video: रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये टी20 विश्वचषकावर नाव कोरले. 17 वर्षानंतर भारतीय संघ टी20 चा जगज्जेता झाला. देशभरातून टीम इंडियाचं कौतुक केले जातेय. गुरुवारी रोहितसेना भारतात दाखल झाली, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंची विश्वचषकातील कामगिरीवर चर्चा झाली. यावेळी मोदींनी रोहित शर्मा, राहुल द्रविड, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यासह टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूंचा गौरव केला. त्याशिवाय त्यांच्यााशी चर्चाही केली. या संपूर्ण चर्चेचा व्हिडीओ समोर आलाय. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्णधार रोहित शर्माला विजयाच्या क्षणाबद्दल प्रश्न विचारला. मोदी म्हणाले की, चषकावर नाव कोरल्यानंतर खूप भावूक दिसत होता. ज्या क्षणी तुम्ही मैदानात जाऊन मातीचा आस्वाद घेतला, त्या क्षणाबद्दल काय सांगाल, विजयानंतर तेथील मातीची चव का चाखली? यावर रोहित शर्मा म्हणाला की, यासाठी आम्ही खूप वेळा प्रयत्न केले. पण आम्हाला यश मिळालं नाही. यावेळी आपल्या संघाने तो पराक्रम गाजवला. त्यानंतर तो असा क्षण आला की ते स्वतःच घडलं, मी मैदानात जाऊन तिथली माती चाखली.  ज्या मैदानावर आम्ही विश्वचषकावर नाव कोरले, त्याच मैदानावर सर्व काही घडले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या चर्चेवेळी कोण काय म्हणाला ? 


1. रोहित शर्मा, कर्णधार


भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला- 'आम्ही सगळ्यांनी या दिवसाची खूप वाट पाहिली होती. यासाठी खूप मेहनत करावी लागली. अनेकवेळा आम्ही विश्वचषक जिंकण्याच्या अगदी जवळ पोहचलो, पण त्यावर नाव कोरता आले नाही. पण यावेळी सर्वांच्या प्रयत्नामुळे आम्ही साध्य करू शकलो.  


2. विराट कोहली


विश्वचषकादरम्यान विराट कोहलीच्या फॉर्ममध्ये परतण्याबद्दल पंतप्रधानांनी प्रश्न विचारला. यावर विराट कोहली म्हणाला,  मी संपूर्ण विश्वचषकात माझ्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकलो नाही. मी हे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही सांगितले होते, की मी माझ्या संघाला न्याय देऊ शकत नाही. तेव्हा प्रशिक्षक म्हणाले की, मला खात्री आहे की जेव्हा संधी येईल तेव्हा तू कामगिरी करशील. पण नंतर तेच झाले... फायनलमध्ये पहिल्याच षटकात तीन चौकार मारले. त्यानतर


नंतर तेच झाले, फायनलच्या दिवशी मी पहिल्याच षटकात 3 चौकार मारले. मग मी रोहितला म्हणालो.. हा कसला खेळ आहे. कधी धावा काढणेही अवघड जाते तर कधी सगळे सोपं व्हायला लागते.